दिनांक 20 ते 22 मार्च दरम्यान जयपुर (राजस्थान) यथे निम्स यूनिवर्सिटी यथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीड़ा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सॉलवो स्पोर्ट्स गेम्स असोसिएशन संघा कडून जबरदस्त कामगिरी बजावण्यात आली.
सदर संघात तेल्हारा मधील खेळाडूंनी प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्र व तेल्हारा तालुक्याचे नाव लौकिक केले. त्या निमित्याने लोकजागर मंच व लोकजागर क्रीड़ा आघाडी तर्फे सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
विजयी खेळाडू खलील प्रमाणे धावपाटु उमेश सहारे (100 मि.) प्रथम क्रमांक, रोहन पाहुरकर (200 मि.) प्रथम क्रमांक, आकाश बरगल (1500 मि.) द्वतीय, अमित दमोधर (400 मि.) प्रथम क्रमांक, बुद्धभूषण भारसाकळे (5 किमी.) प्रथम क्रमांक, पवन बोदडे व शेखर हिवराळे (200 मि.) प्रथम क्रमांक, सूरज भोजने (गोळाफेक) प्रथम क्रमांक. सर्व खेळाडूंनी यशाचे श्रेय सॉलवो स्पोर्ट्स गेम्स असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्रचे सचिव राहुल चव्हाण सर यांना दिले.
समस्त खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.