अकोला – अकोला शहरातील रस्त्यांच्या तसेच उड्डाणपुलाच्या बांधकामा मुळे तसेच शहरातील नागरिकांच्या वाहतूक नियमाचे पालन न करण्याचा मानसिकते मुळे तयार झालेल्या वाहतूक समस्ये मुळे तसेच अवश्यकतेच्या कितीतरी जास्त चालणाऱ्या ऑटो मुळे वाहतूक पोलिसांवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा ताण नेहमीच असतो, त्या मुळे तो बऱ्याच वेळेस त्याला सर्वसामान्य नागरिकांच्या रोषाचा सामना सुद्धा करावा लागतो, परंतु ही सर्व तारेवरची कसरत करीत असतांना सुद्धा शहर वाहतूक पोलीस आपल्या संवेदनशीलतेचा परिचय देत असतांना दिसून येतो, सर्वसामान्य नागरिक, ऑटो चालक ह्यांचे साठी सर्वसमावेशक असे वेग वेगळे उपक्रम राबवित असतानाच आपल्या प्रमाणिकतेचा परिचय देत, नागरिकांचे रस्त्यावर पडलेली पैश्यांची पाकिटे, मोबाईल व महत्वाची कागदपत्रे बऱ्याच वेळेस शोध घेऊन परत सुद्धा केली आहेत। असाच एक प्रसंग आज दिनांक 24।3।21 रोजी सकाळी स्थानिक अग्रसेन चौकात कर्तव्य बजावत असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार राजेश दुबे ह्यांचे बाबतीत घडला, त्यांना चौकात एक महागडा अँड्रॉइड मोबाईल पडलेला दिसला, सुदैवाने तो लॉक नव्हता त्यांनी त्याची पाहणी केली असता त्यांना मोबाईल च्या मालकाचा DP वर फोटो दिसला, त्यांनी त्या वरील एका फोन क्रमांकावर फोन करून त्यांचे मित्राला माहिती दिली तसेच त्याच फोन वर एका पंजाब राज्यातील इसमाचा फोन आला ह्या दोन्ही फोन वरून सदरचा मोबाईल फोन हा गिरीश राठी रा. राधाकिसन प्लॉट अकोला ह्यांचा असल्याचे निष्पन्न झाले, फोन येणाऱ्याला ही माहिती गिरीश राठी ह्यांना देऊन फोन घेण्यासाठी अग्रसेन चौकात पाठविण्यास सांगितले असता, थोड्याच वेळात गिरीश राठी हे अग्रसेन चौकात आले त्यांचे आधार कार्ड चेक करून व DP वरील फोटो वरून ओळख पटवून सदरचा मोबाईल त्यांना परत देण्यात आला तेव्हा त्यांनी वाहतूक पोलीस राजेश दुबे ह्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार व्यक्त केले, राजेश दुबे ह्यांच्या प्रामाणिक पणाचे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, उपनिरीक्षक सुरेश वाघ व सर्व वाहतूक पोलीस अंमलदार ह्यांनी कौतुक केले आहे।