अकोला- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1470 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1212 अहवाल निगेटीव्ह तर 258 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 232 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 73 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 23466(19415+3874+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 138123 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 135608 फेरतपासणीचे 379 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2136 नमुने होते. आजपर्यंत एकूण 137956 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 118541 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
258 पॉझिटिव्ह
आज सकाळी १९५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५९ महिला व १३६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील धोतर्डी येथील १५, बार्शीटाकळी येथील १३, पातूर, नंदापूर ता.पातूर व टाकळी खुर्द येथील प्रत्येकी सात, कौलखेड येथील सहा, भोड येथील पाच, कान्हेरी गवळी, रेणूका नगर, गायगाव, जीएमसी, तापडीया नगर, सिंधी कॅम्प, बाळापूर व गांधीग्राम येथील प्रत्येकी चार, गौरक्षण रोड, जठारपेठ, अकोट फैल, महागाव, कापशी रोड, रणपिसे नगर, उमरी, गांधी रोड येथील प्रत्येकी तीन, सुधीर कॉलनी, मलकापूर, बालाजी नगर, सिंधखेड, गजानन नगर, हरिहर पेठ, नकाक्षी, लांगापूर, दिवेकर चौक, पळसोबढे, खोलेश्वर येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कॉग्रेस नगर, पिकेव्ही कॉलनी, गौतम नगर, गॅस गोडाऊन, किर्ती नगर, शास्त्री नगर, खैर मोहम्मद प्लॉट, सिव्हील लाईन, गोकूल कॉलनी, बलोदे लेआऊट, राहुल नगर, रुस्तमाबाद, गिता नगर, ऐंरडा, काजळेश्वर, पिंपळखुटा, मोठी उमरी, वाशिम बायपास, जमकेश्वर, सस्ती, जामरुन, वारुळी, वाकी, माझोड, बोरगाव, हातरुण, गड्डम प्लॉट, तुकाराम चौक, श्रध्दा नगर, जवाहर नगर, आखतवाडी, खडकी, रजपूतपुरा, माधव नगर, कृषी नगर, खदान, शंकर नगर, पिंपळगाव, वाडेगाव, संतोष नगर, चोहट्टा बाजार, दुर्गा चौक, वसंत टॉकीज, मलकापूर, मोरेश्वर कॉलनी, आयुके निवास, बापू नगर, पोलिस लाईन, देशमुख फैल, खदान, चांदुर, भारती प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, तेल्हारा, खोडके नगर, भिम नगर व व्हिएचबी कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ६३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ४५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पिंपळखुटा येथील सहा, रामदासपेठ येथील पाच, म्हैसपूर येथील चार, मोठी उमरी येथील तीन, मलकापूर, शमशेरपूर, बापू नगर, सिद्धात नगर, पोपटखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित टाकळी खुर्द, सिंधीकॅम्प, केशव नगर, आदर्श कॉलनी, खदान, सुधीर कॉलनी, पावसाळे लेआऊट, जूने शहर, अकोट, गोरक्षण रोड, यमुना नगर, बिर्ला रेल्वे कॉलनी, सागर कॉलनी, जीएमसी, शास्त्री नगर, वैराट, प्रतिक नगर, सिंधी कॅम्प, खडकपूरा, जमकेश्वर, गौतम नगर, वरखेड, रैहम्यत नगर, मुर्तिजापूर, सिरसो, निमवाडी, चैतन्य नगर, डाबकी रोड, तारफैल, शंकर नगर, पंचशील नगर, न्यु भीम नगर, गुडधी, मजलापूर व पणज येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 73 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 195, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 63 तर रॅपिड चाचण्यात 73 असे एकूण 331 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
232 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७९, सहारा हॉस्पीटल येथील एक, हेंडज कोविड केअर सेटर मुर्तिजापूर येथील एक, उपजिल्हा आरोग्य मुर्तिजापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील एक, कोविड केअर सेटर तेल्हारा येथील १०, बिहाडे हॉस्पीटल येथील चार, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, ओझोन हॉस्पीटल येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील नऊ, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, आर्युवेदिक महाविद्यालयातून दोन, तर होम आयसोलेशन येथील १०५ जणांना असे एकूण २३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
पाच जणांचा मृत्यू
दरम्यान आज पाच जणांचे मृत्यू झाले. त्यात सिंधी कॅम्प, मुर्तिजापूर येथील ३२ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १५ रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य लहान उमरी, अकोला येथील रहिवासी असलेला ६८ वर्षीय पुरुष रुग्ण असून त्यांना दि. १७ रोजी दाखल करण्यात आले होते, मराठा नगर, अकोला येथील ९० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश असून या महिलेस दि. १२ रोजी दाखल करण्यात आले होते. तसेच आज सायंकाळी दोंघाचे मृत्यू झाले. त्यात बिर्ला कॉलनी, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष रुग्ण असून या पुरुषास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य एकाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण मोठी उमरी येथील ८८ वर्षीय महिला असून या रुग्णास दि. १८ रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.
5462 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 23466(19415+3874+177) आहे. त्यातील 421 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 17583 आहे. तर सद्यस्थितीत 5462 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.