• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 24, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोविड चाचणी अहवाल नसल्यास दुकाने सिल करण्याचे निर्देश; सोमवार पासून तपासण्या

Team by Team
March 19, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
corona
15
SHARES
620
VIEWS
FBWhatsappTelegram

  अकोला –  जिल्ह्यात सोमवार दि.२२ पासून दुकानांची तपासणी करण्यात येणार असून ज्या दुकानदारांकडे कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल नसेल त्यांची दुकाने सिल करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले. तसेच ग्रामीण भागात जेष्ठ नागरिक तसेच सहव्याधी असणाऱ्या लोकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

या संदर्भात जिल्हा टास्क समितीच्या बैठकीत आज चर्चा झाली. यावेळी मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे सह अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, डॉ.अंभोरे, डॉ.दिनेश नैताम, उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य संबधीत अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

दुकानांची तपासणी सोमवार पासून

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, जिल्ह्यात सोमवार पासून (दि.22) दुकानांचे तपासण्या सुरु कराव्या. दुकानदारांनी स्वतः व आपले कामगार यांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे आणि चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल तरच दुकान सुरू ठेवावे, असे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. यासंदर्भात आता जिल्ह्यात ठिकठिकाणी चाचणी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दुकानदारांनी आपल्या नजिकच्या चाचणी केंद्रावर जाऊन चाचणीसाठी नमुने द्यावेत. आपला अहवाल निगेटिव्ह आल्यास दुकाने सुरू करावीत, अशी अपेक्षा आहे. या सुचनेचे पालन करून दुकानदारांनी प्रशासनास सहकार्य करावे. तथापि दुकानांची तपासणी सोमवार दि.२२ पासून सुरू होणार आहे. यावेळी उघड्या असणाऱ्या दुकानांच्या मालक व नोकर यांचे चाचणी अहवाल नसल्यास त्या दुकानांना सिल करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

ग्रामीण भागात लसीकरणास प्रतिसाद द्यावा

जिल्ह्यात कोविड लसीकरणही सुरु आहे. तुलनेने ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे. विशेषत: 600 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षे वयावरील व सहव्याधी असणाऱ्या सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

ताप सदृष्‌य आजारात कोविड चाचणी करणे आवश्यक

          जिल्ह्यातील लहान मोठया खाजगी रुग्णालयात ताप, खोकला, कफ इत्यादी सदृष्य आजाराच्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णांच्या कोविड चाचण्या करणे आवश्यक आहे. तथापि चाचण्या न करता उपचार सुरु ठेऊन नंतर अत्यवस्थ रुग्ण हे शासकीय इस्पितळात संदर्भीत केले जातात. अशा रुग्णांच्या संदर्भांत संबंधित डॉक्टर्सवर जबाबदारी निश्चित करा, असे निर्देश जिल्हाधिकऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

Tags: Akola news in Marathicovid test
Previous Post

जि.प., पं.स. रिक्त पद निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

Next Post

कुंडलीतील मंगळ दूर करण्यासाठी शिक्षिकेने चक्क १३ वर्षांच्या विद्यार्थ्याशी केले लग्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
marriage

कुंडलीतील मंगळ दूर करण्यासाठी शिक्षिकेने चक्क १३ वर्षांच्या विद्यार्थ्याशी केले लग्न

crime

युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले, चौघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.