• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा: जिल्ह्यातील 18 केंद्रावर प्रतिबंधात्‍मक आदेश लागू

Team by Team
March 19, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, शिक्षण
Reading Time: 1 min read
77 1
0
MPSC
12
SHARES
557
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :–   महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग राज्‍यसेवा (पुर्व) परिक्षा  रविवारी (दि. 21)  जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर सकाळी 10 ते 12 व दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर परिक्षा शांततेत पार पाडण्‍याकरिता रविवार दि. 21 मार्चचे सकाळी सहा ते सायंकाळी  आठ वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्‍या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरील लागून असलेल्‍या 100 मीटर परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहे.

 शिवाजी आर्ट,कॉमर्स अॅन्‍ड सायन्‍स कॉलेज मोर्णा बिल्‍डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मुर्तीजापूर रोड, नेहरू पार्क, अकोला, खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्‍व्‍हेन्‍ट गोरक्षण रोड अकोला, सिताबाई कला महाविद्यालय सिव्‍हील लाईन रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अॅन्‍ड सायन्‍स कॉलेज पुर्णा बिल्‍डींग शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, श्री शिवाजी हायस्‍कूल मुख्‍य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्कजवळ अकोट रोड अकोला, दि.नोएल इंग्लिश हायस्‍कूल विभागीय वर्कशॉपच्‍या मागे, कौलखेड रोड अकोला, भारत विद्यालय तापडीया नगर अकोला, जागृती विद्यालय व उच्‍च माध्‍य. विद्यालय,रणपीसे नगर अकोला, न्‍यु इंग्लिश हायस्‍कूल, शिक्षण संकुल, रामदासपेठ पोलीस स्‍टेशनच्‍या बाजूला अकोला, ज्‍युबिली इंग्लिश हायस्‍कूल / ज्‍युनिअर कॉलेज शिक्षण संकुल, रामदासपेठ अकोला,  मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्‍लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्‍लॉटस डाबकी रोड जुने शहर अकोला, होलीक्रॉस कॉन्‍व्‍हेन्‍ट हायस्‍कूल, जठारपेठ चौक अकोला, श्री शिवाजी विद्यालय हरिहर पेठ जुने शहर अकोला, गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिंधी कॅम्‍प अकोला, डि.ए.व्‍ही कॉन्‍व्‍हेन्‍ट स्‍कूल महात्‍मा गांधी रोड, अकोला, बी.आर. हायस्‍कूल ताजनापेठ मुख्‍य डाक घरामागे अकोला या 18 ठिकाणी परिक्षा होणार आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

        परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती एकत्रितरीत्‍या प्रवेश करणार नाहीत,  कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देण्‍यात येणार नाहीत, परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल व इफ्रारेड थर्मामिटरव्‍दारे तापमान तपासण्‍यात यावे. हवा खेळती राहण्‍याचे दृष्‍टीने परिक्षा केंद्रावरील सर्व खिडक्‍या तसेच दरवाजे उघडया ठेवण्‍यात याव्‍यात, सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परिक्षार्थी यांना मास्‍कचा वापरने बंधनकारक राहिल. मास्‍क लावल्‍याशिवाय प्रवेश देण्‍यात येवू नये, प्रत्‍येक परिक्षार्थीमध्‍ये किमान तीन फुटाचे अंतर राहिल अशी बैठक व्‍यवस्‍था असावी, परिक्षा केंद्राचे प्रवेशव्‍दारासमोर सॅनिटायझरची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी, परिक्षा केंद्राच्‍या परिसराची सोडियम हायपोक्‍लोराईटच्‍या साह्याने निर्जंतुकीकरण करण्‍यात यावे, कोणत्‍याही परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी यांना कोव्हिड-19 ची लक्षणे दिसून आल्‍यास तात्‍काळ नजीकच्‍या रूग्‍णालयात भरती करावे.

            परीक्षा केंद्राच्‍या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्‍य व्‍यक्‍तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्‍य करण्‍यात येणार नाहीत, परीक्षा केंद्राच्‍या 100 मीटर परिसरातील झेरॉक्‍स सेंटर, फॅक्‍स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्‍वनीक्षेपक, इत्‍यादी माध्‍यम परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्‍यात येतील, परीक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल फोन, सेल्‍युलर फोन, ई मेल व इतर प्रसार माध्‍यमे घेवून प्रवेश करण्‍यास मनाई राहील, परीक्षा केंद्रावर कोणत्‍याही अनाधिकृत व्‍यक्‍ती व वाहनास प्रवेशास मनाई राहील.

              प्रतिबंधात्मक आदेश परीक्षा केंद्रावर नियुक्‍त अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी तसेच परीक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचे बाबत परीक्षा संबंधित कर्तव्‍य पार पाडण्‍याचे दृष्‍टीने लागु राहणार नाहीत, असे आदेशात नमूद केले आहे.

Tags: MPSC exam 2020
Previous Post

अकोला : जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू ; 352 पॉझिटिव्ह, 96 डिस्चार्ज

Next Post

जि.प., पं.स. रिक्त पद निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

जि.प., पं.स. रिक्त पद निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

corona

कोविड चाचणी अहवाल नसल्यास दुकाने सिल करण्याचे निर्देश; सोमवार पासून तपासण्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.