अकोट (शिवा मगर) -शासकीय सोईसुविधे करिता रहिवासी दाखला ऐवजी स्वयमघोषणापत्र व कागद पत्राच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्वीकारण्याच्या अनुषंगाने असे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. तसेच उत्पन्न दाखला हा पटवारी दाखल्या नुसार देण्यात येत असतो तो दाखला हा गावाचे पटवारी परिवारातील माहिती घेऊन देतात आणि अनेक वर्ष पासून उत्पन्न दाखला काढण्यासाठी कोणताही एक ओळखीचा पुरावा सेतु केंद्र धारकांना आवश्यक असतो उदा. (आधार कार्ड,मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड व इतर) तरीही आकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेले ना.तह.हरीश गुरव हे आपल्या मनमानी दस्तऐवज मागवुन लोकांना विनाकारण नाहक त्रास देत आहेत. गेल्या मागील ५ वर्षापासून फक्त एक छायाचित्र,पटवारी दाखला,आधार कार्ड व ऑनलाईन चा अर्ज याच्या आधारे आकोट तहसील कार्यालयातून लाखो दाखले निर्गमित करण्यात आले आहेत. पण सध्या परिस्तिथी हम करे सो कायदा अशी झाली आहे. व यांच्या मनाने दस्तऐवज ना जोडल्यास व अश्या सेतु धारक यांच्या हिशोबाने करत नाही हे सरळ त्यांचे दाखले रिजेक्ट करतात असे निर्दशनास आले आहे.
तसेच आकोट तालुक्यातील काही सेतु धारकांचे कामे मात्र एकदम जलदगतीने होत आहेत. कारण ह्या काही सेतु धारकांनी प्रत्येक दाख्ल्यामागे ५ रु द्यायचे कबुली केले असल्याने बरोबर संध्याकाळी 6 ते 9 च्या मधात सर्वाना बोलावून कामे करुन देण्यात येतात. त्या मध्ये काही कागदपत्रे अपुर्ण असले तरीही असे का? आणि यांना कोणताही लोक प्रतिनिधी विचारपुस करण्यासाठी किवा जाब विचारण्यास गेल्यास ते सरळ तोंड बोलण्यास तयार होत नाहीत पण उलट धमकी स्वरुपात,अरेरावी वर उतरून तुम्हाला जे करायचे ते करा निवेदने द्या एक सोडुन चार द्या मला काही फरक नाही पडत अशी उत्तरे देतात व चाल निघ दरवाज्या बाहेर असे जाब देतात. व ज्याच्या कडे तक्रार करायची कर मग मी पाहून घेणार असे शब्द वापरण्यात येतात. आकोट तहसील कार्यलयात हे एकच नायब तहसीलदार असल्याने सर्व सेतु धारक व जनतेला आपल्या जवळच यावे. लागणार या संधीचा फायदा घेऊन यांची मनमानी करत आहेत तरी महोदय आपण या सर्व गोष्टी कडे सबळ लक्ष्य द्यावे व ना.तह.हरीश गुरव यांची अरेरावी व गरीब लोकांना होणारा त्रास येत्या सात दिवसात थांबविण्यात यावा. नाही तर आम्ही आमच्या मागणी साठी व त्रस्त जनतेला होणाऱ्या त्रासाकरिता मागणी पुर्ण नाही होत तो पर्यंत आपल्या आकोट तहसील कार्यलयातील दालनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठिय्या ठोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनातुन करण्यात आला.सदर निवेदन म.न.वि.से जिल्हा उपाध्यक्ष सुरज वर्मा शहर अध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी साहेब यांना देण्यात आले. त्या प्रसंगी शुभम देशपांडे , पवन नागले,बंटी पांडे,हर्शल बोडखे, प्रज्वल गुजर, आशिष गवई , निखील नकाशे, किरण इंगळे,अक्षय रोही,तेजस लेंघे,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होत अशी माहीती मनविसे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली.