• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गुन्हे दाखल करायचे असतील तर करा; पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही-विश्व वारकरी सेना

Team by Team
September 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, महाराष्ट्र, राज्य
Reading Time: 1 min read
78 1
0
गुन्हे दाखल करायचे असतील तर करा; पण धार्मिक कार्यक्रम बंद करणार नाही-विश्व वारकरी सेना
38
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोट(शिवा मगर): महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतभूमी मध्ये महाराष्ट्र सरकारने कोरोचे नाव पुढे करून एक वर्षापासून धार्मिक कार्यक्रम बंद केले आहे. मागील काही काळात सर्व वारकरी संघटनांनी आपापल्या परीने आंदोलन केले व गेल्या एक महिन्यापासून धार्मिक कार्यक्रम नियम पाळून चालू झालेले होते; पण पुन्हा कोरोणा ची लाट आली असे कारण सांगून धार्मिक कार्यक्रम बंद करण्यात आले. देशी दारूचे दुकान,मॉल, चित्रपट गृह, राजकीय मीटिंग, राजकीय मोर्चे हे सर्व चालू आहे. . कुठे धार्मिक कार्यक्रम असला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही धाकही दाखवने चालू आहे. मुळात हे महाराष्ट्र सरकारचे चुकीचे धोरण असून कार्यक्रमावर बंदी आणणे योग्य नाही. आपण नियमावली देऊन कार्यक्रम सुरू करू शकता. सध्या उत्तराखंडमध्ये हरिद्वारला कुंभमेळा मध्ये लाखो भाविक उपस्थित आहेत. वृंदावन मध्ये कुंभमेळ्यात लाखो भाविक आहेत, उत्तर प्रदेश मध्ये काशी, अयोध्या क्षेत्रात भाविकांना कोणतेही बंधन नाही, गुजरात मध्ये द्वारकेला, सोरटी सोमनाथ ला कोणतेही बंधन नाही आपल्या महाराष्ट्रातील भाविक भारतातील सर्व राज्यांमध्ये मोठ्या संख्येने दर्शनाला जात आहेत. पण इतर कोणत्याही राज्यात धार्मिक कार्यक्रमावर बंदी नाही मग महाराष्ट्रातच धार्मिक कार्यक्रमावर का बंदी, कोरोना फक्त महाराष्ट्रातच आहे का ,या आशयाचे निवेदन आज अकोट तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार निलेश मडके व ज्ञानोबा फड साहेब अकोट ग्रामीण पोलीस पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. व या निवेदनाची दखल सरकारने त्वरित घ्यावी आणि सरकार जर वारकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असेल व वारकऱ्यांच्या नम्र मागणीचा मान राखत नसेल तर आम्ही सरकारचा मान न राखता कुठेही परवानगी ला न जाता धार्मिक कार्यक्रम चालूच ठेवणार आहोत मग भलेही आपल्याला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे असल्यास खुशाल करू शकता. सरकारने वारकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आपण धर्माचे रक्षण कराल तर धर्म आपले रक्षण करील आणि आपण जर धर्माचा नाश करायला जाल तर धर्म आपला नाश केल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन अकोट तहसील कार्यालय येथे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी ह भ प विठ्ठल महाराज साबळे विश्व वारकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर महाराज पातोंड, रतन महाराज वसु, श्रीधर महाराज तळेकर, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज वसु, सोपान महाराज ऊकर्डे,विक्रम महाराज शेटे, अमोल महाराज कुलट,ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, विठ्ठल महाराज खलोकार , ओंकार महाराज टौलारे, पुरुषोत्तम महाराज नेमाडे, गजानन मोडक, गजानन फुंडकर व निखिल गावंडे उपस्थित होते.

Tags: Vishwa Warkari Sena
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समित्याचे सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी मंगळवारी(दि.23) सोडत

Next Post

वाहन स्क्रॅप पॉलिसी : जुने वाहन असेल तर हे नक्की वाचा…

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
वाहन स्क्रॅप पॉलिसी : जुने वाहन असेल तर हे नक्की वाचा…

वाहन स्क्रॅप पॉलिसी : जुने वाहन असेल तर हे नक्की वाचा...

गीता-बबिता फोगाटची मामे बहीण रितिका फोगाट ने केली आत्महत्या

गीता-बबिता फोगाटची मामे बहीण रितिका फोगाटने केली आत्महत्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.