पातूर (सुनिल गाडगे) – अकोला येथील संत गाडगे बाबा कृस्ती केन्द्र येथे आयोजीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव संजय यादव याने ९२ किलो वजनी गादी विभागात प्रतिस्पर्ध्याला चारिमुंडया चित करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी निवड करण्यात आली असुन या मुळे राज्याच्या कृस्ती मध्ये पातूरचे नाव नौकीक झाले आहे.
पातूर येथील शिव संजय यादव यांने अकोला येथे महाराष्ट्र कृस्ती स्पर्धेच्या चाचणी मध्ये सहभागी झाला होता त्याने चाचणी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता आपले स्थान निश्चीत केले आहे शिव यादव हा पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पहेलवान संजय यादव यांचा मुलगा असुन शिव यास कृस्तीचे प्राथमीक धडे घरीच मिळाले आहे शिव चे पजोबा सोनाजी यादव ,आजोबा प्रल्हादराव यादव हे त्या काळचे नामी पहेलवान होते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुन अनेक मल्लाना तयार करण्याचे काम पहेलवान संजय यादव करीत आहे तसेच आजतागायत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अनेक सदस्य आर्मी,सी आर पी एफ,रेल्वे विभाग,पोलीस दलातून देशसेवेचे कार्य करत आहेत तसेच अनेक सदस्य हे शासकीय सेवेत दाखल झाले आहेत गेल्या ४० वर्षांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे युवकांना उज्वल भविष्याचा रस्ता दाखवण्याचे व सशक्त युवकशक्ती घडविण्याचे योग्य कार्य करत आहे तसेच अनेक समाजपयोगी कार्यात सुद्धा मंडळाचा हिरारीने सहभाग असतो पातूर तालुक्याच्या इतिहासात इतक्या कमी वयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला शिव यादव हा पहिला च मल्ल आहे शिव यांच्या निवडीने त्याचै कौतुक होत आहे शिवने आपल्या निवडीचे श्रेय भोजु बायस, संजय यादव, चंदु वानखडे, महादेव खंडारे,शंकर इनामदार,विष्णु ढोणे, छत्रपती गाडगे प्रशांत बंड आदिना दिले आहे