अकोला(दीपक गवई)- दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालीत सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अध्यक्ष ॲड मोतिसिंह मोहता व मानद सचिव पवणजी माहेश्वरी यांच्या प्रेरणेने व महाविद्यालय विकास समीतीचे अध्यक्ष रूपचंदजी अग्रवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर डि सिकची यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व आय क्यु ए सी च्या वतीने व निरंतर शिक्षण विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या सहभागाने कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थे वरिल परिणाम या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. सर्व प्रथम या परिषदेचे आयोजक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रसन्नजीत गवई यांनी प्रास्ताविकेतुन महाविद्यालयाची तसेच अर्थशास्त्र विभागाची माहिती देउन अर्थशास्त्र विभागाचे महत्व विशद केले. यावेळी महाविद्यालय आय क्यु ए सी चे संचालक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ दिनकरराव उंबरकर यांनी सर्वांचे स्वागत करून अर्थशास्त्रीय राष्ट्रीय परिषदेचे महत्व व गरज सांगीतले. या परिषदेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून अप्पास्वामी महाविद्यालय शेंदुरजना अढाव चे माजी प्राचार्य डॉ एच आर तिवारि ह्यानी आपल्या मार्गदर्शनात भारतीय अर्थव्यवस्थेवरिल कोविड १९ चा भारतीय अर्थव्यवस्थे वरिल परिणाम सांगताना अर्थव्यवस्थेच्या विविध अंगावर काय काय परिणाम झाला व त्यामधून कशा प्रकारे अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ संतोष कुटे याच्या अध्यक्षते खाली पारपडलेल्या पहिल्या सत्रात आपले शोधनिबंध सादर करतांना डॉ. अपरजित दत्ता सहायक प्राध्यापक, दिब्रुगर्ह युनिव्हर्सिटी आसाम मधील ज्युरिडीकल स्टडीजसाठी लो सेंटेअर यांनी करोनाचा लिगल प्रोफेशन वर झालेला परिणाम विशद केले. डॉ. अमित कुमार गिरी यांनी चाकण पुण्यातील एमएसएम कर्मचार्यांकडून जबरदस्तीने घेतलेल्या रीट्रेंमेंट कारवाईमुळे कोविड १९ दरम्यान नोकरी गमावलेल्या ऑटो घटक उद्योगात काम करणाऱ्या ब्लू कॉलर कामगारांवर काय आर्थिक परिणाम झाला याचा शोधनिबंध सादर केला. कु. प्राची वसंतराव काळे यांनी कोरोना चा रोजगिरीवरील परिणामाची चर्चा केली. जळगांव विद्यापीठातील संशोधक अर्चना पाटील यांनी जळगांव जिल्ह्यातील जल सिंचना मुळे कृषी विकसात झालेली वाढ -कोविड -19 चा त्यावर झालेला परिणाम विशद केला. प्रा. किर्तिका चोरे यांनी कोविड 19 चा औधोगिकिकरणा वर झालेला परिणामाची चर्चा शोध निबंधाच्या माध्यमातून केली. डॉ डि के राठोड यानी आपल्या शोध निबंधात करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरिल परिणाम सविस्तर विशद केले. यावेळी या परिषदे करिता ७३ संशोधक प्राध्यापकांनी आपले शोधनिबंध प्रकाशित केले. यावेळी आपल्या मार्गदर्शनात डॉ संतोष कुटे यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत विशेषत: रोजगार व कृषी क्षेत्रावरील परिणाम व त्यामुळे झालेल्या हानी सविस्तरपणे मांडुन त्यावरिल उपाययोजना मांडल्या. समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विकास समीतीचे अध्यक्ष रूपचंदजी अग्रवाल यांनी समारोपीय मार्गदर्शनात परिषद ठेवण्यामागील हेतु व महत्व विषद करून सर्वाना शुभेच्छा दिल्या. परिषदेला यशस्वी करण्याकरिता डॉ प्रसन्नजीत गवई, प्रा किर्तिका चोरे, प्रा भाग्यश्री बोर्डे, प्रा प्रतिभा येवले, प्रा बेंद्रे, प्रा गावंडे प्रा धिरज भाला यांनी परिश्रम घेतले.