अकोला : दि. 12 दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2677 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2359 अहवाल निगेटीव्ह तर 353 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 299 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर चार रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे दि.11 रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 35 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 20589(16973+3439+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 128123 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 125688 फेरतपासणीचे 378 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2057 नमुने होते. आजपर्यंत एकूण 128020 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 111047 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
353 पॉझिटिव्ह
आज सकाळी २५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७७ महिला व १८० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील २३, अकोट येथील २१, जीएमसी येथील १५, खदान येथील ११, डाबकी रोड व पिंपळगाव येथील प्रत्येकी नऊ, मलकापूर येथील सहा, कौलखेड, गिता नगर, मोठी उमरी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, दानोरी, अनिकेत, गणेश नगर, अकोली जहाँगीरी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी चार, आळसी प्लॉट, सूकोडा, खडकी, जठारपेठ,गोरक्षण रोड, अकोट फैल, फिरदोस कॉलनी, गायत्री नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन, देशमुख फैल, तारफैल, गुलजारपुरा, सांगवी खुर्द, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, पोलिस हेडक्वॉटर, कृषी नगर, तापडीया नगर, लहान उमरी, गोपालखेड, ताकवाडा, गोरेगाव बु., बार्शीटाकळी, सिंधी कॅम्प, पोळा चौक, सिव्हील लाईन, शिवाजी पार्क, रतपूतपुरा, निमकर्दा व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कुबा मशिद, दुर्गा नगर, अंबिका नगर, रणपिसे नगर, माधवनगर, दत्ता कॉलनी, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, आनंद नगर, मित्रा नगर, जूने शहर, सिंधी कॅम्प, नया अंदुरा, वस्तापूर, एमआयडीसी, सरस्वती नगर, पंचशील नगर, कोठारी वाटीका, लक्ष्मी नगर, रामकृष्ण नगर, गौतम नगर, मुझ्झफर नगर, रुख्मिनी नगर, अकोली खुर्द, माधव नगर, दापूरा, रहानखेड, आपातापा, शिवनी, कवर नगर, पळसोबढे, कुरणखेड, चांदुर, जूने आरटीओ रोड, हिंगणा, अमांख्या प्लॉट, मोमीनपुरा, रणपिसे नगर, राऊतवाडी, केशव नगर, गजानन नगर, वानखडे नगर, भिमनगर, खोलेश्वर, दगडीपुल, चांडक प्लॉट, गजानन नगर, लोथखेड, करोडी, खेताननगर, सांगवी बाजार, उमरी, बोरगाव वऱ्हाडे व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात १८ महिला व ४३ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील केशव नगर येथील सात, खडकी येथील सहा, खेतान नगर येथील पाच, वर्धमान नगर येथील चार, मलकापूर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, जीएमसी, राऊतवाडी व मयुर कॉलनी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पातूर, जूने शहर, न्यु तापडीया नगर, तापडीया नगर, सिव्हील लाईन, संत नगर, बायपास रोड, मोठी उमरी, रिंग रोड, डाबकी रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, कुंभारी, निमवाडी, गंगा नगर, फिरदोस कॉलनी, बाजोरीया नगर, रतनलाल प्लॉट, हिंगणा रोड, सिंधी कॅम्प, जठारपेठ, देशमुख फैल, अकोट फैल, गणेश नगर, आयटीआय, संजीव नगर, माधव नगर व गजानन नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.
दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात 35 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 257, सायंकाळी आरटिपीसीआरच्या चाचण्यात 61 तर रॅपिड चाचण्यात 35 असे एकूण 353 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
299 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५०, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून सात, हॉटेल रिजेन्सी येथून चार, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील एक, आर्युवेदिक महाविद्यालयातून चार, बाईज हॉस्टेल अकोला येथून १५, हॉटेल स्कायलार्क येथून सात, तर होम आयसोलेशन येथील २०० जणांना असे एकूण २९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
चौघांचा मृत्यू
दरम्यान आज चौघांचा मृत्यू झाले. त्यात तेल्हारा येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, विठ्ठल नगर कौलखेड येथील रहिवासी असलेली ८२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर कानशिवणी बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेली ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते,तसेच सायंकाळी बोरगाव वैराळे, बाळापूर येथील रहिवासी असलेला ७३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.
4899 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 20589(16973+3439+177) आहे. त्यातील 397 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या 15293 आहे. तर सद्यस्थितीत 4899 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.