• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

Team by Team
September 25, 2021
in Featured, महाराष्ट्र, योजना, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
89 1
0
17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू
18
SHARES
643
VIEWS
FBWhatsappTelegram

नवी दिल्ली : देशातील 17 राज्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना लागू करण्यात आली आहे, असे अर्थ मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. या योजनेत सामील होणाऱ्या राज्यांमधील उत्तराखंड हे ताजे नाव आहे.

GSDP च्या 0.25 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर्जासाठी पात्र ठरतील राज्य
ज्या राज्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांची पूर्तता केली आहे, ते राज्य आपल्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या (Gross State Domestic Product) 0.25 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त कर्जासाठी पात्र ठरतील. या योजनेअंतर्गत रेशनकार्डधारक देशातील कुठल्याही रेशन दुकानातून आपल्या हक्काचे रेशन घेऊ शकतात.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

राज्यांना 37,600 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्याची मिळाली परवानगी
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, त्यानुसार या राज्यांना डिपार्टमेंट ऑफ एक्सपीडेंचरद्वारे 37,600 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी दिली आहे. ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (National Food Security Act) आणि इतर कल्याणकारी योजना, विशेषत: स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी, देशातील कोठेही उचित किंमत दुकानात (Fair Price Shop) लाभार्थ्यांना रेशनची उपलब्धता सुनिश्चित केली गेली आहे.

या सुधारणा विशेषत: मजूर, दैनंदिन भत्ता कामगार, कचरा उचलणारे, रस्त्यावर राहणारे, संघटित आणि असंघटित क्षेत्रातील तात्पुरते कामगार, घरगुती काम करणारे कामगार इत्यादींना अन्न सुरक्षेच्या संदर्भात सशक्त बनवेल, जे नेहमी कामासाठी आपल्या मूळ राज्यातून दुसर्‍या राज्यात जातात.

कोविड-19 महामारीमुळे सर्व देशभर उद्भवलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या स्त्रोताची आवश्यकता लक्षात घेता, भारत सरकारने 17 मे 2020 रोजी राज्यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा त्यांच्या जीएसडीपीच्या 2 टक्के वाढविली होती.

या विशेष वितरणाचा अर्धा भाग राज्यांनी नागरिक केंद्रित सुधारणा करण्यासाठी पुढील चार क्षेत्रात जोडलेला होता: (a) एक राष्ट्र एक रेशन कार्ड (शिधापत्रिका) व्यवस्था अंमलबजावणी, (b) व्यवसाय सुलभता सुधारणा करणे, (c) शहरी स्थानिक संस्था / उपयोगिता सुधारणे आणि (d) उर्जा क्षेत्रातील सुधारणा.

Tags: one nation one card
Previous Post

अकोला जिल्ह्यात ३४५ कोरोना पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

Next Post

उद्यापासून चार दिवस बँका बंद! आजच करून घ्या बँकेचे कामं

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
बँक

उद्यापासून चार दिवस बँका बंद! आजच करून घ्या बँकेचे कामं

12th &10th exam

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनीयर बनता येणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.