तेल्हारा :- दिनांक ८/३/२०२१ रोजी महावितरण तेल्हारा उपविभागात महिला दिन ३३ के व्ही उपकेंद्रामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहायक अभियंता कु कल्याणी गावंडे होत्या प्रमुख पाहुणे उपकार्यकारी अभियंता श्री सचिन कोहाड साहेब व तेल्हार ग्रामीण -२ चे कनिष्ठ अभियंता राजसिंह गोठवाल उपस्थित होते .सर्व प्रथम वंदनीय सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन कु कल्याणी गावंडे यांनी केले श्री कोहाड साहेब व गोठवाल यांनी पुष्पहार अर्पण केला .
प्रथम कु कल्याणी गावंडे सहायक अभियंता यांनी कृषी वीज बिल सवलत योजना २०२० विषयी विस्तृत माहिती दिली नंतर श्री राजसिंह गोठवाल यांनी मनोगत व्यक्त केले व महिलांनी महावितरन सोबत जुळून थकबाकी वसुली मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले .
कार्यक्रमामध्ये रुपाली वाकोडे महिला जनमित्र यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कृषी वीज बिल सवलत योजने अंतर्गत कृषी वीज बिलाची रुपये १००००० /- थकबाकी वसूल केल्यामुळे त्यांचा उपकार्यकारी अभियंत श्री सचिन कोहाड यांनी पुष्पगुच्छा देऊन सत्कार केला
कार्यक्रमामध्ये महिलांबाबत आज जगात मोठ्या प्रमाणात समानता आढळून येते हि बाब स्पृहणीय आहे यावर संवाद झाला .महिला स्वताच्या मेह्नतिने बचत गटामार्फत गटाची व स्वताची समृद्धी व विकास करू शकते ,अशी योजना शासनाने व महावितरणने आणली आहे या योजने मध्ये सहभागी होऊन शेतकरी बांधवांसाठी कृषी वीज बिल सवलत योजना आहे त्यात सहभागी होऊन वीज बिल वसूल करून आणल्यास ३० % रक्कम महिला बचत गटाला मिळेल व त्यामधून महिलांनी स्वताचा ,गटाचा तसेच परिसराचा गावाचा विकास करू शकता. तसेच प्रत्येक शेतकरी बंधूनी ह्या योजनेचा लाभ घेऊन थकबाकी मुक्त व्हावे व थकबाकीमुक्त झाल्याचे सन्मानपत्र मिळेल , असे श्री कोहाड साहेब उपकार्यकारी अभियंता महावितरण तेल्हारा यांनी सांगितले.
कार्यक्रमाला तालुक्यातील महिला बचत गटांचे प्रतिनिधी सौ शीतल बी वाघ अडसूळ ,सौ कोमल एन तायडे अडसूळ ,सौ सुवर्ण पी वरुलकर इसापूर ,सौ सुरेखा एम देशमुख भंबेरी ,श्रीमती आम्रपाली व्ही गावारगुरूर खाकटा ,सौ उर्मिला दि नेरकर नेर धामण सौ जयश्री वारकरी तेल्हारा श्रीमती दुर्गा एस अरूळकार तेल्हारा श्रीमती सुजाता एस वाकोडे तेल्हारा श्रीमती अर्चना एस शेजोले तळेगाव डवला ,व रेखा बोडखे सौ इंगळे सौ वाकोडे इत्यादी हजर होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन पल्लवी राउत ह्यांनी केले