तेल्हारा : तालुक्यातील विविध ठिकाणावरून अवैधपणे उत्खनन करून साठवून ठेवलेली जप्त रेती चा लिलाव न करता तेल्हारा तालुक्यातील घरकुल धारकांना शासकीय भावात रेती देणे या बाबत विषयांतर्गत सोमवारी दि 8 मार्च रोजी तेल्हारा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमो शहर अध्यक्ष गणेश इंगोले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
गत दोन वर्षात कोणतीही रेती घाट हर्रास झाले नसल्याने शहरातील केंद्र शासनाची पंतप्रधान आवास योजना रेती अभावी खंठबस्त्यात असून लाभार्थी वाळूसाठी भटकती करित आहे.न.प. प्रशासन सदर घरकुल लाभार्थींना काम सुरू न केल्याने नोटीस बजावत आहे अशा स्थितीत अव्वाच्या सव्वा भावात रेती खरेदी करावी लागत आहे अशा परिस्थितीत महसूल विभागाने जप्त केलेली अवैध रेती हर्रास न करता शासकीय भावात लाभार्थी गरजू घरकुल धारकांना देण्यात चे प्रयत्न करावे त्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी तेल्हारा तहसिलदाराकडे दिनांक 8 मार्च एका निवेदनातून तेल्हारा शहर भाजयुमोच्या वतिने केली आहे. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड , जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहणे, शहर सरचीटणीस रवि गाडोदिया, तालुका प्रसिद्धी प्रमुख रवि शर्मा, नगर सेवक सुनिल राठोड , अतुल विखे, ऋषभ ठाकूर जोशी यांच्या सह्या आहेत.