तेल्हारा(प्रतिनिधी)-सध्याच्या परिस्थितीत वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. एकीकडे तरुण पिढीकडून वाढदिवसाच्या दिवशी मोठा खर्च करून जल्लोष केल्या जातो, तर श्री शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ वाघोडे व ऋषीराज बोन्द्रे यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी समजा पुढे आदर्श निर्माण केला आहे. खरं तर वाढदिवस म्हटलं म्हणजे मोठाले बॅनर, पार्टी, मौजमस्ती करून भला मोठा खर्च करणारी तरुण तुम्हा आम्हाला पाहायला मिडतात, पण या तरुणांनी असा वायफळ खर्च न करता समजा पुढे आदर्श निर्माण करत आपल्या सर्व मित्रानं च्या सहकार्याने मातोश्री वृद्धाश्रमात भोजन व दैनंदिन जीवनातील साहित्याचे वाटप केले, आणि कुणाल शिंदे यांच्या प्रयत्नातून वृद्धाश्रमातील वृद्धांना लवकरात लवकर कोरोनाची लस सुद्धा देण्यात यावी या साठी सुद्धा प्रयत्न केले त्या ठिकाणी संकेत भालेराव, स्वप्नील धुमाळे, निहाल चौधरी, शुभम पौळ,किशोर गावंडे, मंगेश चांदूरकर, अभिषेक हिस्सल,रुपेश पत्रिकर, प्रतिक पखान, आकाश भगत,अंजली खंडेराव, अंकित राऊत, अभिनव वाघाडे, अनिकेत फाटकर,आरती देव, स्वाती फरकाळे, हे विद्यार्थी उपस्थित होते.