अकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये अकोट विधानसभा मतदार संघातून मोठ्या बहुमताने निवडून आले आहे. तर यांच्या पत्नी सौ भारसाकळे या सुद्धा दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर रुजू आहे. तर मुलगा हा जिनिंग प्रेसिंग चा कारभार सांभाळतो. परंतु अचानक 20 फेब्रुवारीच्या दरम्यान प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या निवासस्थानी दर्यापूर येथे एका अज्ञात बिहारी नामक व्यक्तीने हिंदीमध्ये पत्र पाठवून पाच कोटी रुपये 28 फेब्रुवारी पर्यंत देण्यात यावी. अन्यथा तुमच्या मुलाला जीवाने मारण्याची धमकी त्या पत्रात देण्यात आली आहे. त्या पत्राच्या आधारे 21 फेब्रुवारी रोजी दर्यापूर पोलीस स्टेशन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आज रोजी संबंधित पत्राची माहिती पसरताच आता संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले आहे. कारण आमदार प्रकाश पाटील भारसाकळे हे राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे हे धमकीचे पत्र कोणी पाठवले असेल याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. सदर घटनेच्या संदर्भात दर्यापूर पोलीस तपास करीत आहे.
प्रतिक्रिया:- सदर धमकीच्या पत्राची दखल दर्यापुर पोलिसांनी घेतली असून अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . व पुढील तपास ए.पी.आय जाधव, बजरंग इंगळे करीत आहे
प्रमेश आत्राम, ठाणेदार दर्यापूर