पातूर: तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत आहे. तालुक्यात रविवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या ८३ वर पोहोचली असून, मळसूर येथील एका वृद्धांचा मृत्यू झाला आहे. गत आठवड्याभरात कोरोनामुळे मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या शंभराच्या उंबरठ्यांवर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोग्य विभागामार्फत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीला नागरिकांसह व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. गत आठवड्याभरात तालुक्यात कोरोनाचा आकडा शंभराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गत आठवड्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, शनिवारी मळसूर येथील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या आठवड्यात खानापूर येथील १५ वर्षे मुलगी, पातूर व मळसूर येथील एका असे एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच कोरोना चाचणी केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.