समाजात आपल्याला अनेक निराधार, वृध्द, अंध, अपंग शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, देवदासी महिला, अनाथ बालके आजूबाजूला पहायला मिळतात. त्यांच्यासाठी समाजातील काही लोकं ‘माझं या समाजासाठी काही देणे लागतं या जाणीवेतून’ काम करतात. तर काही सामाजिक संस्था यात भाग घेतात. त्याच बरोबर अशा लोकांचे जीवन गतीमान आणि सुसह्य करण्यासाठी राज्य शासन विविध योजनांमधून काम करत आहे. शासनामार्फत अशा लोकांना त्या योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. अशाच एका योजनेने राज्यातील अनेक निराधारांना आधार दिला आहे. ती योजना म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना.
अर्ज कोठे व कोणी करावा?
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी साधारणपणे अशा निराधार लोकांनी अर्ज करायचा आहे. जे स्वत:चा उदरनिर्वाह करू शकत नाहीत. यामध्ये निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, दुर्धर आजार झालेल्या व्यक्ती, एच.आय.व्ही ग्रस्त, घटस्फोटीत महिला, दुर्लक्षित असणारी महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, अत्याचार झालेली महिला, ट्रान्झेंडर यांच्यासह ३५ वर्षांच्यावरील वय असणारी अविवाहीत महिला यासाठी अर्ज करू शकतात. तसेच हा अर्ज तलाठी किंवा तहसिल कार्यालयामध्ये भरुन सादर करावा.
उत्पन्न किती असावे
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न २१००० किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसेच अर्जदाराने अर्जासोबत वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला द्यायचा आहे. त्याचबरोबर अर्जदार ज्या प्रवर्गातून अर्ज दाखल करणार आहे त्या प्रवर्गातील संबधित कागदपत्रे सादर करावी लागतील.
उदा. १) अपंगांसाठी अपंग असल्याचे प्रमाणपत्र
२) महिला विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र
तसेच अर्जदारास मुले असल्यास मुलांच्या २५ वर्षांपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत) या योजनेचा लाभ घेता येतो. तर ज्या निराधार अर्जदारास फक्त मुली आहेत. अशा ही व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. अशा अर्जदाराच्या मुलीच्या वयाच्या २५ वर्षांपर्यंत अथवा तिचे लग्न होऊ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.
आवश्यक कागदपत्रे
१) वयाचा दाखला
२) रहीवासी दाखला किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
३) दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हील सर्जन)/शासकीय रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा दाखला
४) उत्पन्नाचा दाखला/द्रारिद्रय रेषेखालील कुटूंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकीत उतारा
फायदे :
या योजनेतंर्गत लाभार्थ्याला दरमहा ६०० / अर्थसहाय्य देण्यात येते. हा लाभ लाभार्थ्याला वयाच्या ६५ वर्षे वयोमर्यादेपर्यंत देता येते. तर एकापेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या कुटुंबाला दरमहा ९०० रुपये लाभ मिळतो.
तसेच अर्जदारास मुलगा असल्यास मुलाच्या २५ वर्षांपर्यंत किंवा नोकरी मिळेपर्यंत (यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत) या योजनेचा लाभ घेता येतो.
तर ज्या निराधार अर्जदारास फक्त मुली आहेत. अशा ही व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. अशा अर्जदाराच्या मुलीच्या वयाच्या २५ वर्षांपर्यंत अथवा तिचे लग्न होऊ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो.
योजनेची लिंक: https://cdn.s3waas.gov.in/s317e62166fc8586dfa4d1bc0e1742c08b/uploads/2018/03/2018031988.pdf