अकोला(दीपक गवई)- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी रयतेसाठी आदर्श राज्य निर्माण केले.प्रत्येकाने एक एक वृक्ष जगविण्याचा संकल्प करुन शिवरायांचे स्वप्न साकार करु या असे प्रतिपादन शिक्षणसंस्था संचालक मंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय कौसल यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था संचालक मंडळ व छत्रपती श्री,शिवाजी महाराज मेमोरीयल ट्रस्ट नवी दिल्लीचे वतीने शिवजयंतीनिमित्त सर्व शाळांमध्ये वनौषधी रोपटे भेट देण्यात आले.त्यानिमित्त श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखेत बोलत होते.
श्री.शिवाजी विद्यालय शाळा समिती सदस्य विलासराव हरणे व मुख्याध्यापक डी.आर. वानखडे यांनी अतिथींचे स्वागत केले.प्रारंभी श्री.शिवाजी महाराज व शिक्षणमहर्षी डाॅ.भाऊसाहेब देशमुख यांचे पुतळ्याचे पुजन शाळा समिती सदस्य विलासराव हरणे व मुख्याध्यापक डी.आर. वानखडे यांनी केले. याप्रसंगी कु. गौरी मोडक या विद्यार्थीनीने शिवरायावर पोवाडा सादर केला. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन बबनराव कानकिरड यांनी केले.आभारप्रदर्शन सौ.शुभांगी गावंडे यांनी केले. पर्यवेक्षिका सौ.प्रतिभा गावंडे,सौ.खोटरे,आर.बी.अरबट,पराग ठाकरे,एस.एम.धोत्रे,संदिप पारसकर,प्रशांत पावडे,मिलींद लांडे,ए.एल. देशमुख,उमेश मोहोड,व्ही.पी. गावंडे,संदिप ठाकरे यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.