अकोला(दीपक गवई)- महानगरात छत्रपती शिवाजी महाराज यांची पावन जयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने होत असून शिवजयंती सप्ताहात अनेक उपक्रम आयोजित करण्यात आलेआहेत. जयंती दिनी महानगरातील सर्व शिवप्रतिमांचे पूजन करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी दिली.समितीच्या वतीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसप्ताहाची माहिती देण्यात आली.यावेळी समितीचे कार्याध्यक्ष पवन महल्ले,सचिव चंद्रकांत झटाले, शोभायात्रा प्रमुख पंकज जायले आर्दी पदाधिकारी उपस्थित होते. दि.19 फेब्रुवारी रोजी संपन्न होणाऱ्या शिवजयंतीचा उपक्रम सप्ताह दि 11 फेब्रुवारी रोजी दु..4 वाजता
सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांच्या उद्घाटनाचे सुरु होत असून दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत अनेक शोर्यत्मक व शिवकालीन, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यात १२ फेब.रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाविद्यालय येथे वकृत्व स्पर्धा होत असून याचे नियोजन सौरभ वाघोडे व अंकुश इंगळे करणार आहेत. दि.13 फेब.रोजी सकाळी
11 वा.विविध शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धा होणार असून याचे नियोजन नरेंद्र चीमनकर,रेवती तंवर,अंजली देशमुख करणार आहेत. दि.13 ते दि.18फेब पर्यंत सकाळी 11 वाजता विविध विद्यालयात व्याख्यानमत्ला होणार असून दि.14 फेब.रोजी स.11 वाजता सहकार नगर येथील शिवस्मारक परिसरात भव्य चित्रकला स्पर्धा होणार आहे.याचे नियोजन प्रभाकर रुमाले,शरद कोकाटे,संजय शेरेकर करणार आहेत.तसेच सकाळी 11 वा.शिवाजी महाराज पार्क येथे आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे.या उपक्रमाचे नियोजन समितीचे कार्याध्यक्ष पवन महल्ले,संदीप बाथो,राहुल
लोहिया करणार आहेत. दि.15फेब.ते 17 फेब.पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यस्तरीय वाल पेंटिंग स्पर्धा होत असून शिवाजी महाराजांच्या बालपणापासून तो पराक्रमापर्यंत प्रत्येक क्षण पार्क च्या भिंतीवर अंकित करणाऱ्या या उपक्रमाचे नियोजन प्रा.गजानन बोबडे,आशिष चौथे करीत आहेत. दि.15फेब.रोजी स.10 वा.स्थानीय असदगड किल्ला येथे 11 वर्षाच्या खालील बालका करिता बाल शिवाजी व माँ जिजाऊ वेशभूषा स्पर्धा होणार असून याचे नियोजन गणेश कळसकर,अमोल ढोकणे हे करीत आहेत. दि.17 फेब.रोजी साय.6 वा. स्थानीय स्वराज्य भवन परिसरात 150 पेक्षा जास्त कलाकारांचे भव्य शिवसृष्टी महानाट्य व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.याचे नियोजन किशोर बळी व पूजा काळे करणार आहेत. दि.18फेब.रोजी स.10 वा.छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे किल्ले बांधणी स्पर्धा
होणार आहे.याचे नियोजन एड.अनिल लव्हाळे करणार आहेत.या दिनी दुपारी 3 वा.छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य रांगोळी स्पर्धा होऊन साय.6 वा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून महानगरात भव्य मशाल यात्रा काढण्यात येणार आहे.याचे नियोजन अश्विन कपले,अमोल इंगोले करणार आहेत.मुख्य जयंती सोहळा हा दि.19 फेब.रोजी भव्य
प्रमाणात साजरा करण्यात येणार असून या दिनी स.6 वा. छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून हा उपक्रम मराठा सेवा मंडळ साकार करणार आहे.सकाळी 10 वा.अनेक कलाकारांच्या वतीने पोवाडे व शिवगीत स्पर्धा होणार आहेत.याचे नियोजन पवन महल्ले,सागर कावरे,आकाश कबडे साकार करणार आहेत.दुपारी 4 वा.अव्य लेझिम स्पर्धा होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे दि.17 फेब.ते 19 फेब.पर्यंत शिवकालीन नाणे व दोनशे राष्ट्रातील करन्सी चे प्रदर्शन होणार आहे. नाणे संग्राहक अक्षय खाडे यांनी हा उपक्रम साकार केला आहे.या जयंती सप्ताहात छ.शिवराय शॉर्ट फिल्म फेस्टीवल आयोजित करण्यात आला आहे.हा उपक्रम प्रवीण हटकर यांनी साकार केला आहे. तसेच घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धा होत असून स्पर्धकांनी आपले फोटो
काढून समिती कार्यालयात पाठवावेत.हा प्रकल्प नारायण ठाकरे व मधुकर मानकर यांच्या नियंत्रणात राहणार असून दि.19 फेब.रोजी शिवजयंतीचा मुख्य सोहळा हा स्वराज्य भवन प्रांगणात होणार असून शिवकालीन द्वार हे आकर्षणाचेकेंद्र ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या शिवजयंती सप्तहातील उपक्रमात नागरिक महिला पुरुषांनी सामाजिक अंतर राखीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही जयंती साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेस समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.