अकोट ( शिवा मगर)– अकोट दि 10 गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात व संपूर्ण भारतात थैमान घातलेल्या कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने तसेच मागील वर्षातील किमान ७ ते ८ महिन्याचे लॉक डाऊन असल्यामुळे नागरिकांच्या हाताला काम नाही त्यामुळे अगोदरच जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे त्यातून सावरत असताना त्यात आता महावितरण कंपनीने लॉकडाउन काळातील थकित वीज बिल भरण्यासाठी ची सक्तीची वसुली मोहीम राबवत आहे तसेच काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करत असल्याची तक्रार तसेच महावितरणचे कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहे हे तत्काळ थांबवावी व सहकार्य करावे ही हात जोडून विनंती आहे.
अन्यथा जर का ही वीज बिल भरण्यासाठी ची सक्तीची वसुली, वीज पुरवठा खंडित करणे व कर्मचारी यांच्या कडून होणारी अरेरावीची भाषा नाही थांबली तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरणची व संबंधित अधिकाऱ्याची असेल निवेदन मुख्य अभियंता म.रा.वि.वि अकोट यांना देण्यात आले.
सदर निवेदन म.न.वि.से जिल्हा उपाध्यक्ष सुरज वर्मा शहर अध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात देण्यात आले त्या प्रसंगी शुभम देशपांडे , आशिष गवई , निखील नकाशे, किरण इंगळे,अक्षय रोही,तेजस लेंघे,व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होत अशी माहीती मनविसे प्रसिद्धी प्रमुख अजय शर्मा यांनी दिली