चोहोट्टा बाजार(पुंजाजी खोडके)- दि.८ फेब्रुवारी रोजी उमेद महाराष्ट्र चोहोट्टा बाजार येथे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा स्वयंम सहायता महिला समूहाना कर्ज वाटप मेळावा संपन्न राज्य राज्य जीवनोन्नती अभियान व विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा चोहट्टा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने२० बचत गटाला पंचवीस लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले.या मेळाव्याला विदर्भ कोकण ग्रामीण बँक क्षेत्रीय प्रबंधक सुबोध बन्नोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच या मेळाव्याच्या प्रमुख उपस्थिती अकोट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर शिंदे सर तसेच साहाय्यक गटविकास अधिकारी ओम प्रकाश गाठेकर , जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद अभियान गजानन महल्ले , विस्तार अधिकारी जितेंद्र नागे, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापक चोहोट्टा बाजारचे विलास पातोडे , एम एस आर एल एम तालुका अभियान व्यवस्थापक अकोट नितीन वाघ, प्रभाग समन्वयक आदिनाथ सानप, विक्रम शेटे उपस्थित होते.
यावेळी टाकळी बु., देवर्डा, पळसोद, सालखेड या गावातील उमेद अभियानातील एकूण २० स्वयंम सहायता समूहाना २५ लाख रुपये कर्ज शाखेकडून वाटप करण्यात आले तसेच १२५ महिलांचा प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या ठिकाणी काढण्यात आला. ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेल्या समुहातील महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला,तसेच नियमित कर्ज परत फेड करण्याऱ्या समूहाचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याकरिता राम रहीम ग्राम संघ चोहोट्टा बाजार तसेच सर्व उमेद कॅडर बँकेचे सर्व कर्मचारी यांनी योगदान दिले.