अकोट- फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारातील चळवळीचे युवा नेतृत्व संदेश सुरेश घनबहादुर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्या मध्ये मा. जयंतरावजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाअध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये पक्षात प्रवेश घेतला.राष्ट्रवादी पक्षाचे ध्येयधोरण हे सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारे आहे त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याचे निर्णय घेऊन संदेश सुरेश घनबहादुर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती मा. जयंत रावजी पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र मा. राजेंद्रजी शिंगणे. अन्न व औषध प्रशासन तथा संपर्कमंत्री. मा मेहबूबभाई शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस . मा गुलाबरावजी गावंडे माजी मंत्री. मा अमोलदादा मिटकरी. आमदार. मा तुकारामजी बिडकर माजी आमदार. मा संग्रामभैया गावंडे अकोला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी. मा कैलास भाऊ गोडचोर अकोट तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मा. नवनितजी लखोटिया अकोट शहर अध्यक्ष. यांच्यासह अकोट व तेल्हारा विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते