तेल्हारा(किशोर डांबरे)– तेल्हारा उन्हाळ्याची चाहूल लागतच सर्वांना आतुरता लागते ती होळी आणि रंगपंचमी सणाची बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारची केमिकल युक्त महागडी रंग विक्रीला येत असतात जनता सुद्धा मोठ्या आवडीने या रंगाची मागणी करतांना दिसतात.या मुळे परंपरागत चालत आलेल्या पळस या झाडापासून रंग बनविण्याच्या पद्धती लोप पावतांना दिसत आहे यावर कृषी विज्ञान केंद्र अकोला यांच्या वतीने तेल्हारा तालुक्यातील ग्राम गाडेगाव येथे बचत गटाच्या महिलांना नैसर्गिक रंग बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्र अकोल्याच्या विषय विशेषज्ञ कीर्ती देशमुख यांनी बचत गटाच्या महिलांना नैसर्गिक रंगाचे मानवी शरीरावर कुठलेही अपाय होत नसल्याचे आणि बाजारपेठेतील रासायनिक रंगामुळे होणारे मानवी शरिरावरील दुष्परिणाम विशद केले. या प्रशिक्षणात पळस, कडुलिंबाची पाने,गुलाबाच्या पाकळ्या,विट, नीळ, हळद,डाळिंबाची साल,पारिजातकाची फुले,पानात खाण्याचा काथ, पालक,शेवग्याची पानं, आणी झेंडूची फुले या पासून नैसर्गिक रंग बनविण्याचे शिकवले.या मार्गदर्शनामुळे बचत गटांच्या महिलांना एकप्रकारे रोजगार निर्मिती असून कोरोनाकाळातून सावरून आर्थिक मिळकत सुरू होणार असल्याने बचत गटांच्या महिलांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी गावचे सरपंच प्रमोद वाकोडे,कीर्ती देशमुख विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र अकोला ,आसरे तांत्रिक सहाय्यक , देवकाबाई गावंडे ,शारदा मोरवाल,नीता सोनोने इत्यादी