अकोला(दीपक गवई)– केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीतील शेतकरी आंदोलन करीत आहेय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान विकास मंचने अकोल्यात वाशिम बायपास चौकात व मलकापूर हायवे वर आज चक्का जाम आंदोलन केलय.
: अकोल्यातील वाशीम बायपास येथील काही मिनिटातच हे आंदोलन संपविण्यात आलेय. आंदोलनकर्त्याना रस्त्यावर बसू देताच त्यांना पोलिसांनी उठवून त्यांना अटक केली.यावेळी चारही बाजूंची वाहतूक कोंडी झाली होतीये.तसेच अकोल्यातील मलकापूर हायवे वर सुद्धा चक्का जाम आंदोलन करण्यात आलाय,या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान विकास मंचचे विवेक पारस्कर,अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय.