बाळापूर :- विनापरवाना दारूची वाहतूक करीत असतांना बाळापूर पोलिसांनी दोघांना पकडले वाडेगाव येथे सकाळी बाळापूर पोलीसांनी नाकाबंदी केली असता दोन इसम प्रशांत दंडावने,आणि गोवर्धन गवई रा.मळसूर हे मोटारसायकल क्र.एम.एच.30 बि.1496 ने विनापरवाना दारुची वाहतूक करीत असतांना आढळुन आलेत्यांचे जवळून 884 दारूच्या देशी देशी विदेशी बाटल्या किंमत 23,440 रुपये आणि एक मोटारसायकल किंमत 50,000 रुपये एकूण 73,440 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करित सदर आरोपीविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारीसुभाष राठोड, मुशीब खान पठाण,विजय जामाणिक यांनी केली.