• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून नानांचा राजीनामा – वंचित

Team by Team
February 5, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा – वंचित बहूजन आघाडी.
12
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)– ईव्हीएम सोबत मतदान पत्रिकेचे गाजर दाखवून चर्चेत आलेल्या नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मतदान पत्रिका उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला होता.त्यावर चर्चेचे गु-हाळ सुरू असताना आज त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देवुन कालची त्यांची घोषणा म्हणजे बोलाची कढी असल्याचे सिध्द केले असून काँग्रेस भाजपा मध्ये तत्वीक दृष्टीने काही फरक नसल्याची असल्याची टिका वंचित चे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांना आता ईव्हीएम व्यतिरिक्त मतपत्रिकेव्दारे देखील मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विधानसभाअध्यक्ष नाना पटोले यांनी परवाच दिल्या होत्या.या संबंधीचा कायदा महाराष्‍ट्र विधानमंडळाने करावा अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.मुंबई विधानभवन येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयचे सचिव राजेंद्र भागवत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग आणि राज्याचे विधी व न्याय विभागाचे सचिव भुपेंद्र गुरव उपस्थित होते.ईव्हीएमसोबत मतदान पत्रिकेचा पर्याय मतदारांना उपलब्ध असला पाहिजे. भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 328 प्रमाणे राज्यातील निवडणुकांच्या बाबत कायदा तयार करण्याचे अधिकार राज्य विधीमंडळाला आहेत. अनुच्छेद 328 नुसार राज्य विधानमंडळाला असलेल्या अधिकारानुसार अनुषंगिक कायदा तयार करुन राज्यातील जनतेला ईव्हीम व्यतिरिक्त मतपत्रिकेने मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा. त्यावेळी मतदार आपल्या इच्छेनुसार ईव्हीएम किंवा मतपत्रिकाव्दारे मतदानाचा हक्क बजावू शकतील, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

नानांचा हा पवित्रा ईव्हीएम बाबतच्या काँग्रेसच्या गुळगुळीत भूमिकेवर थेट आघात करणारा होता.देशात ईव्हीएम इन्ट्रोड्यूस करणाऱ्या काँग्रेसने भाजप आधी मशीन मॅनेज करण्याची सुरुवात केल्याचा आरोप होत आहे.त्यामुळे काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व सदैव ईव्हीएम विरोधात लढ्यात पुढे येत नव्हते. परवाच्या नानाच्या घोषणेनंतर राज्यात मतदान पत्रिकेचा पर्याय उपलब्ध होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.मात्र अवघ्या एक दिवसात नानांची विधानसभा अध्यक्ष पदावरून एक्सिट पाहता त्यांची ही घोषणा सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेली घोषणा होती, हे सिध्द झाले असून काँग्रेसचे नेते सदैव आपल्या ‘कथनी करणी’ मध्ये खरे उतरत नसल्याचा आरोप देखील वंचितने केला आहे.ईव्हीएम सोबत मतदान पत्रिका बाबत पुढे काय होणार ह्याची स्पष्टता महाराष्ट्र राज्यातील जनतेला काँग्रेसचे नेते सांगतील अशी अपेक्षा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: vanchit bahujan aaghadiबहुजन वंचित विकास आघाडी
Previous Post

ड्रोनव्दारे गावठाण भूमापन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Next Post

जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधीकरण च्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न

विनापरवाना दारुची वाहतूक करतांना दोघांना पकडले बाळापूर पोलिसांची कारवाई; 73 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

विनापरवाना दारुची वाहतूक करतांना दोघांना पकडले बाळापूर पोलिसांची कारवाई; 73 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.