सेक्स (sex) हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. असे असताना सेक्स अर्धवट झाला तर शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? याच विषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
डॉ. राहुल पाटील सांगतात की, खाजगी जागा आणि पुरेसा वेळ मिळाला नाही किंवा कुठल्याही भीतीने सेक्स पूर्ण होत नाही. अशा वेळी दोघांमध्ये चिडचिड होते, पुन्हा लगेच प्रयत्न केला आणि पुरुषाला ताठरता आली नाही की पुन्हा तो घाबरतो, वीर्यपतन झाले नाही तर वृषणग्रंथीमध्ये वेदना होतात. अशा वेळी हस्तमैथुन करून ती वेदना कमी होते. इतर असा काही वाईट परिणाम शरीरावर होत नाही.
डॉ. पाटील पुढे सांगतात की, मुळात सेक्स करणे हा हृदय, फुप्फुस यांसाठी चांगला व्यायाम आहे. हे केल्याने शरीरातील ताकद कमी होत नाही. वीर्यनाश झाल्याने ताकद जाते, ही अंधश्रद्धा समाजात खूप पसरली आहे. त्यामुळे पुरुष घाबरतात. पुरुषाच्या कंबरेला चांगला फायदा होतो. विविध आसन केल्याने वेगवेगळ्या मसल्सला फायदा होतो. सेक्स करताना जवळपास सर्व मसल वापरले जातात.