अकोला – अकोल्यातील उच्चभ्रु वसाहत मधे हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली देहव्यापार करणाऱ्या डॉक्टरचा दहशतवादी विरोधी पथकाने भंडाफोड़ करुन एक महिला एक ग्राहक तसेच याठिकाणी काम करणारा व्यक्ती व व्यवस्थापकाला काल रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. अकोल्यातील गजबजलेल्या परिसरात ही रेड पडल्याने अकोला शहरात ख़ळब़ळ उडाली.
अकोला शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जवाहर नगर परिसरात रुग्णांच्या मसाज करिता डॉ. प्रदीप देशमुख यांनी तेजस्वी हेल्थ केअर सेंटर सुरू केले. दिवस भराचा थकवा घालवण्यासाठी ग्राहक देखील येत होते परंतु हेल्थ केअर सेंटर, आंबट शौकिनाचा अड्डा असेल याची थोडीशी ही कल्पना कुणाला नव्हती.या हेल्थ केअर सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती अकोला दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक येथे पाठवला.
तेव्हा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली आणि पोलिसांनी तेथे छापा टाकला.या केंद्रातून डॉ. प्रदीप देशमुख (५५) तसेच रिसोड तालुक्यातील चिंचाबापेन येथील रहिवासी संतोष सानप (५०) वर्आणि लहान उमरी महात्मा फुले चौक येथील रहिवासी रतन लोखंडे (३५ )यांच्यासह पिडीतमहिलेला ताब्यात घेतले.एटीसीच्या तक्रारीवरून सिव्हील लाईल पोलिस ठाण्यात देह व्यापार अधिनियम १९५६ अंतर्गत ३,४,५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.