हिवरखेड(बाळासाहेब नेरकर) – हिवरखेड येथे आज अयोध्या येथिल राम जन्मभूमी मंदीर निर्मान समर्पण निधी संकलन कार्यालयाचे व श्रीरामाचे पुजन बालाजी सस्थांनचे पुरोहीत श्री संतोष महाराज वैष्णव व यजमान श्री सूरेशजी गूप्ता यांचे हस्ते झाले. यावेळी तेल्हारा तालूका संघचालक श्री माधव बनकर तसेच सूरेश शिगंनारे यांची प्रमुख उपस्थिति लाभली प्रथम श्रीराम मंदिरा पासून भव्य मोटर सायकल रॅली गावातुन काढन्यातआली यावेळी पोलीस स्टेशन हिवरखेडचे ठाणेदार धिरज चव्हान, दुय्यम ठाणेदार गोपाल दातिर, सह सोळंके, मेजर शिवा गांवडे, कवळे मेजर, गृहरक्षक दलाचे जवान यांनी रॅली प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला. रैली चा समारोप ,नीधी समर्पन कार्यालयाजवळ होऊन अयोध्या येथील भव्य श्रीराम मदिंर निर्मान नीधि संकलन कार्यालयाचे उद्घाटन झाले या प्रसगी आपल्या प्रास्तावीकातुन शिगंनारे गूरुजी यानी रामजन्मभूमी आदोंलन व , कारसेवकाचे कार्याची व अनुभवाची माहिती संगीतली ,तसेच त्यानी कोठारी बंधुचे व कारसेवकाची केलेल्या कार्याची माहीती सागीतली यावेळी निधि संकलनाची पहिली पावती जितुसेठ लाखोटिया यांनी पाच हजार शंभर रुपये देऊन आपली राममंदिर बाधकामासाठी नीधी सकंलनाची सूरवात केली.हिवरखेड येथे पहिल्या दिवशी राम जन्मभूमी समर्पण निधी एक लक्ष एक हजार रुपये राम भक्तांकडून मिळाले.
राम जन्मभूमि समर्पण निधि प्रत्येक प्रभागामधे निधी सकंलन जबाबदारी स्वयंसेवकांना देण्यात आले तरी आराध्य दैवत असलेल्याश्रीराम मंदिर निर्मानसाठी प्रत्येकानी हातभार लावावा.माझे ही तिथे फुल नाही फुलाची पाकळी मंदीर निर्मान मधे असावा हा द्दुष्टीकोन सगळ्यानी बाळगूण मंदीर निर्माण कार्यात योगदान श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र कार्यालय मेन रोड हिवरखेड येथे आपली समर्पण निधी देण्याचे आवाहन श्री राम जन्मभूमि समिती हिवरखेड उपखंड यांच्याकडून करण्यात आले आहे.