अकोला – पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ला आग लागल्याची घटना घडलीय या आगीत पाच जणांचा मृत्यु झाला यापैकी एक अकोल्यातील चांदुर येथील इंजिनिअर महेंद्र प्रकाश इंगळे याचा समावेश आहे.
कोरोनाची लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. लस निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या या कंपनीत कोरोनावरील कोविशिल्ड लस तयार होत आहे.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. भीषण अशी ही आग असून धुराचे लोट आकाशात पसरले होते. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
दरम्यान, अकोला (चांदुर बाजार)येथील महेंद्र हा नवीन बिल्डिंगच्या मेंटन्स साठी आपल्या कंपनी कडून गेला होता, लागलेल्या आगीत त्याचा मृत्यु झाला त्याचा मृतदेह आज चांदुर येथे येणार असून त्यांच्यावर अकोल्यातील चांदुर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत महेंद्र यांच्या मृत्यू मुळे चांदुर परिसरात शोककळा पसरली आहे.
महेंद्र हा मूळ अकोल्यापासून पाच किमी अंतरावर असलेल्या चांदुर येथील असून प्राथमिक शिक्षण हे चांदुर येथे करून पॉलिटेक्निक वाशीम येथे केले त्यानंतर नागपूर येथे इंजिनिअर पदवी मिळवून गेल्या सहा वर्षांपूर्वी तो पुणे येथे ऐका कंपनी मध्ये लागला होता इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने त्याला कंपनी कडून मेंटेनन्स करिता पाठवल्या जात असे सिरम ईथे याच काम निमित्त गेलेला असता आगीमध्ये त्याचा मृत्यू झाला महेंद्र याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.महेंद्र यांच्या मागे पत्नी आई वडील भाऊ बहीण असा बराच आप्त परिवार आहे.आज दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
सिरम इन्स्टिटय़ूट चे सायरस पुनावाला यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त केले असून मृतकांच्या कुटूंबाला प्रत्येकी २५ लाखाची मदत देण्याचे म्हटले आहे.