पुणे : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. आता महिलांना लष्करात भरती होण्याची मोठी संधी आहे. महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया होणार आहे. १२ ते १४ जानेवारी दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. (Great opportunity for women in the army recruitment process will be implemented in pune)
ही भरती प्रक्रिया पुण्यात होणार आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यातील युवा महिलांना सहभाग घेता येणार आहे. त्यासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पुण्यातील आर्मी इन्सिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर होणार आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळेल. त्यांची शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. शारिरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना लष्करी पोलिस दलात दाखल करुन घेतले जाणार आहे. (Great opportunity for women in the army recruitment process will be implemented in pune)