• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

आणीबाणीतील बंद्यांना सहा महिन्यांचे थकीत पेन्शन देण्याचा न्यायालयाचा आदेश

Team by Team
January 9, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
आणीबाणीतील बंद्यांना सहा महिन्यांचे थकीत पेन्शन देण्याचा न्यायालयाचा आदेश
13
SHARES
595
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : १९७७ मध्ये लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या व्यक्ती व मृतांच्या वारसांचे थकीत सहा महिन्यांचे पेन्शन देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. दरम्यान, या निर्णयाने महाविकास आघाडी सरकारला चपराक बसली असून, उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना स्वातंत्र्यसैनिकांच्या धर्तीवर आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना जुलै २०१८ मध्ये पेन्शन सुरू केली होती. त्यानुसार एक महिना तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा १० हजार रुपये, व त्यापेक्षा कमी तुरूंगवास भोगलेल्यांना दरमहा ५ हजार रूपये पेन्शन देण्यात येत होती. या निर्णयामुळे आणीबाणीत बंदीवास भोगलेल्या राज्यातील सुमारे ३५०० हून अधिक बंदीवान व मृतांच्या नातेवाईकांचा सन्मान झाला होता. तर ८०० बंदीवानांकडून केलेल्या अर्जावर निर्णय प्रलंबित होता. अडचणीत सापडलेल्या लोकशाहीतील स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात उठविलेल्या आवाजाबद्दल नागरिकांचा भाजपा सरकारने सन्मान झाला होता. त्याबद्दल राज्यातून देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यात येत होते अकोला जिल्ह्यातील. आणीबाणीची कार्यकर्ते व परिवारांना पेन्शन मिळवून देण्यासाठी आमदार सावरकर सतत पाठपुरावा करून पेन्शन मंजूर करून दिली होती हे विशेष मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आर्थिक अडचणीचे कारण देत पेन्शन रद्द करण्यात आली होती. यासंदर्भात ३१ जुलै २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशात फेब्रुवारी ते जुलै २०२० पर्यंत पेन्शन देण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. या अन्यायकारक निर्णयाविरोधात राज्यात चौफेर टीका झाली होती. मात्र, आणीबाणीतील बंदींना थकीत सहा महिन्यांचे पेन्शन देण्यातही दिरंगाई होत होती. अखेर या संदर्भात लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ दीक्षित व पदाधिकारी अनंत आचार्य यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व श्रीकांत डी. कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी लोकतंत्र सेनानी संघाच्या वकिलांनी तत्काळ सहा महिन्यांची थकीत पेन्शन देण्याची विनंती केली. तसेच राज्य सरकारचा पेन्शन बंद करण्याचा निर्णय रद्दबातल ठरविण्याची विनंती केली. त्यावेळी राज्य सरकारच्या वकिलाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली. त्याचबरोबर १० फेब्रुवारीपर्यंत ६ महिन्यांचे थकीत पेन्शन देण्याचे आदेश दिले, अशी माहिती आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिली. या निर्णयाबद्दल भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे तसेच न्यायालयाकडून चपराक मिळाल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने पुन्हा पेन्शन पूर्ववत करावे, अशी मागणी केली आहे.

Tags: औरंगाबाद खंडपीठभाजपाचे आमदार रणधीर सावरकर
Previous Post

भंडारा नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येकी दहा लाखांची मदत दया – वंचित

Next Post

पातूर येथे महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
mamhatma phule mahavidyalaya

पातूर येथे महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार

उदय सामंत

राज्यातील महाविद्यालये केव्हा सुरू होणार ? मंत्री उदय सामंत यांची दिली महत्त्वाची माहिती

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.