अकोला – जिल्हा परिषद व पंचायत समीती हे विकासाची व दिशा देण्याचे केंद्र आहेत. येणाऱ्या निधीचे नियोजन करून विकासकामे पूर्णत्वास नेले पाहिजे. अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण अनेक विकास व नावीन्यपूर्ण योजना राबवितो. मतदारसंघ निहाय विकास कामांचे नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक सदस्यानी आपआपली जबाबदारी पार पाडावी. जिल्हा परिषद व पंचायत समीतीच्या सदस्यांनी आपाआपल्या मतदार संघातील समस्या समजून त्या तत्परतेने सोडवाव्यात. अनेक वावड्या उठतात त्या कडे आपण दुर्लक्ष करा कारण जिल्हा परिषद व पंचायत समीती मधिल सत्ता ही या पुढेही आपलीच म्हणजे वंचित बहुजन आघाडीचीच राहिल असे प्रतिपादन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत अकोला जि प सदस्य व जिल्ह्यातील सातही पंचायत समिती सदस्य यांची सयुक्त बैठक घेण्यात आली. यामध्ये ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषद समन्वय समिती सदस्य तथा प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर यांनी जिल्हा परिषद निधी वळविण्याच्या घोषणेचा खरपूस समाचार घेउन समन्वय समीतीच्या जबाबदाऱ्या सांगितल्या. आपल्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष तथा समन्वय समीती प्रदिप वानखडे यांनी जि प मध्ये असलेल्या विविध योजना व त्या राबविण्यात येणाऱ्या अडचणी विशद केल्या. यावेळी समन्वय समीती सदस्य दिनकरराव खंडारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी विचारमंचावर प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे, दिनकरराव खंडारे, जिल्हा परिषद गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई उपस्थित होते. बैठकीला अकोला जिल्हा परिषद व पंचायत समीती चे सर्व सदस्य तथा पदाधिकारी उपस्थित होते.