• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला : जिल्ह्यातील चारही केंद्रावर यशस्वी ठरली लसीकरणाची ‘सराव फेरी’

Team by Team
January 9, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
Covid dry ran
12
SHARES
564
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड लसीकरणाची रंगीत तालीम जिल्हा स्त्री रुग्णालय, अशोक नगर आरोग्य केंद्र, अकोला तसेच कान्हेरी सरप ता. बार्शी टाकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बार्शी टाकळी ग्रामिण रुग्णालय येथे व्यवस्थित पार पडली. ह्या सराव साखळीतील सर्व घटकांनी सर्व जबाबदाऱ्या यशस्वी पणे पूर्ण करुन जिल्ह्यातील चारही केंद्रावर यशस्वी सराव केला.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ही सराव फेरी पार पडली. त्यासाठी सकाळी जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत सराव फेरीचा प्रारंभ करण्यात आला. या लसीकरण केंद्राची फित कापून जिल्हाधिकाऱ्यांनी विधीवत प्रारंभ केला. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आरती कुलवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

असा झाला सराव

लसीकरणासंबंधित डाटा संकलित केलेल्या ‘कोविन ॲप’ मधील नोंदींनुसार नोंदविलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा सराव करण्यात आला. यावेळी लसीकरण करुन घेण्यासाठी नोंदणी कक्षात आलेल्या व्यक्तिस टोकन देऊन, नाव नोंदणी करण्यात आली. त्यानंतर ओळखपत्र वा आधार कार्डच्या आधारे नोंदणीची ऑनलाईन पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लसीकरण कक्षात लस घेणाऱ्या व्यक्तीच्या सर्व शंकांचे निरसन करुन लस टोचण्याचा सराव झाला. त्यानंतर झालेल्या लसीकरणानंतर संबंधित व्यक्तिस काही परिणाम जाणवतात वा लक्षणे दिसतात का याबाबत निरीक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीस निरीक्षण कक्षात ठेवण्यात आले. या सर्व टप्प्यावर लसीकरण अधिकारी व त्यांचे कर्मचारी तैनात होते.

या सराव फेरीत राज्यस्तरावरुन जिल्ह्यांचे यूजर आयडी, जिल्हास्तरावरुन आरोग्य संस्थेचे व लसीकरण पथकाचे यूजर आयडी यांचे कार्यान्वयन तपासण्यात आले. जिल्ह्यांनी चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अॅपमध्ये केलेले लसीकरण सत्र व त्याचे मॅपिंग करण्यात आले, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोविन पोर्टलवर अपलोड करुन, लाभार्थी व आरोग्य सेविकेचे सत्र स्थळ निश्चित केले, लस वाटप व शितसाखळी जोपासणे, कळविणे, आरोग्य सेविका, लसीकरण अधिकारी एक ते चार आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्या ठरल्याप्रमाणे पार पाडण्यात आल्या.

या सर्व सराव फेरीच्या विविध टप्प्यांची जिल्हाधिकारी पापळकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष्य उपस्थित राहून पाहणी केली. ऑनलाईन पद्धतीने पार पाडावयाच्या प्रक्रिया बिनचुक पार पडल्या. ॲप वरील नोंदींनुसार सर्व सराव पार पडला.

Tags: covid vaccination dry rundry runकोविड लसीकरणाची ‘सराव फेरी’
Previous Post

जिल्हास्तरीय तांत्रीक समितीची बैठक पीक कर्जदरात प्रतिहेक्टरी वाढ करण्यास मंजूरी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर

जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील सत्ता हि जनसामान्यांच्या विकासाकरिता उपयोग करा- ॲड बाळासाहेब आंबेडकर

ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा – वंचित बहूजन आघाडी.

भंडारा नवजात अर्भकांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून प्रत्येकी दहा लाखांची मदत दया - वंचित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.