अकोला – महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) तर्फे कॉ. नयन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली व कॉ. सुनीता पाटिल यांच्या नेतृत्वात अंगणवाडी कर्मचा-यांना सेवासमाप्ती नंतर पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा खालीलप्रमाणे प्रस्ताव मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. मा. वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई. मा. मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई. मा. सचिव व मा. आयुक्त एकात्मिक महिला व बाल विकास विभाग मुंबई यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुण मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद अकोला मार्फत पाठविण्यात आले आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर १ लाख रू व मदतनिसांना ३० वर्षाच्या सेवेनंतर ७५ हजार रू. सेवासमाप्ती लाभ मिळतो. या रक्कमे मध्ये अंगणवाडी कर्मचा-यांचा दृध्दाप काळामध्ये निर्वाह होऊ शकत नाही. या आर्थिक लाभाबरोबर त्यांना खालीलप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, अशी आम्ही विनंती करीत आहोत. महाराष्ट्र राज्यांत दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून त्यापैकी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका मदतनिस मिळून सुमारे २५०० कर्मचारी वयाच्या ६५ वर्षानंतर सेवानिवृत्त होतात. २५०० कर्मचा-यांपैकी सेविका १२५० व मदतनिस १२५० अशी संख्या असू शकेल. आत्ता अंगणवाडी सेविकांना सुमारे दरमहा ८५०० रू., मिनी अंगणवाडी सेविकांना दरमा ५७५०रू.व मदतनिसांना दरमहा ४५०० रू. मानधन मिळते. त्यांना त्यांच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम सेवानवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी, अशी संघटनेची मागणी आहे. म्हणजे अंगणवाडी सेविकांना ४२५० रु., मिनी सेविकांना २८७५ रू. व मदतनिसांना २२५० रू. दरमहा पेन्शन मिळू शकेल. या प्रस्तावामुळे शासनावर खालीलप्रमाणे आर्थिक बोझा पडेल.
१२५० सेविका × दरमहा पेन्शन रू. ४२५० x १२ महिने – ६.३७ कोटी रू.
१२५० मदतनिस × दरमहा पेन्शन रू. २२५० x १२ महिने – ३.३७ कोटी रू.
वार्षिक आर्थिक बोझा ९.७५ कोटी रू.
यानुसार अंगणवाडी कर्मचा-यांना दरमहा पेन्शन दिल्यास सरकारवर दरवर्षी ९.७५ कोटी रू. इतका आर्थिक बोझा येईल. दरवर्षी ९.७५ कोटी रू. या दराने पुढील ५ वर्षामध्ये रू. ४८.७५ कोटी इतका बोझा येईल. ही रक्कम स्थिर राहील. सध्या अस्तित्वात असलेल्या सेवानिवृत्ती लाभ योजनेकरीता महाराष्ट्र शासनाकडून प्रतिमाह अंगणवाडी सेविकांसाठी २०० रू. व मिनी सेविका व मदतनिसांसाठी १०० रू. योगदान दिले जाते. ही योजना ३०.४.२०१४ पासून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आमच्या ढोबळ अंदाजानुसार सर्व सेविकांचे व मदतनिसांचे मिळून वर्षाचे ३६ कोटी रूपये जमा होतात. दि. १.४.२०१४ ते ३१.३.२०२० या कालावधीसाठी शासनाकडे २१६ कोटी रू. जमा झाले आहेत. त्यापैकी अंगणवाडी सेविका/मदतनिसांना सेवासमाप्तीचा एकरकमी लाभ देण्यासाठी गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे १३१ कोटी रू. खर्च झालेला आहे. म्हणून शासनाकडे सुमारे रू. ८५ कोटी शिल्लक आहेत व दरवर्षी त्यामध्ये ३६ कोटी रूपयांनी भर पडणार आहे. अंगणवाडी सेविका/मदतनिसांना अर्णा मानधनाएवढी जर दरमहा पेन्शन दिली तर त्याकरीता दरवर्षी १ कोटी ५० लाख रू. लागतात. महिला बालविकास खात्याकडे किंवा एलआयसी कार्यालयाकडे उपलब्ध असणा-या व होणा-या रकमेमधून सहजपणे अंगणवाडी कर्मचा-यांना वयाच्या ६५ वर्षानंतर, सेवानिवृत्त झाल्यानंतरच्या काळाकरीता, त्यांच्या अर्ध्या मानधनाएवढी रक्कम दरमहा पेन्शन देता येणे सहज शक्य आहे.
ही मागणी आम्ही गेली अनेक वर्षे शासनासमोर मांडत आहोत. त्याबरल सहानुभूतीने विचार करण्याची अनेक वेळा आश्वासने देण्यात आली आहेत. परंतु त्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. आपण अंगणवाडी कर्मचा-यांना, सध्याच्या सेवासमाप्ती लाभाच्या रक्कमे खेरीज दरमा अर्धा मानधनाएवढी पेन्शन देण्याचा शासकीय ठराव ताबडतोबीने करावा, अशी मागणी निदर्शने आंदोलन करुण लवकरात लवकर मागणी पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात असा ईशारा कॉ. नयन गायकवाड़ यांच्या मार्गदर्शन खाली कॉ. सुनीता पाटिल, कॉ. सुरेखा ठोसर, कॉ. दुर्गाताई देशमुख, कॉ. कुसुमताई हागे, कॉ. सरोजताई मुर्तिजापुरकर, कॉ. त्रिवेनीताई मानवटकर, कॉ. आशाताई मदने, कॉ. महानंदा ढोक, कॉ. ज्योति ताथोड, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. ज्योति धस, कॉ. वंदना डांगे कॉ. हाजरा परवीन, कॉ. नसरीनबाई उपस्थित होते असे कॉ. प्रिया वरोटे यांनी कळवले आहे..!*