पातूर (सुनिल गाडगे) – तेल्हारा तालुक्यातील एका महिला शिक्षिकेचा पाठलाग करुन तिला त्रास देत धमकी देणारा नराधम शिक्षकाच्या विरोधात हिवरखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या नंतर हा शिक्षक फरार असुन हिवरखेड पोलीस या शिक्षकाच्या तपासा करीता पातूरात आले आहे.
पातूर येथील सावरगांव येथील एका खाजगी संस्थेवर शिक्षक असलेला अनिल आ़यस्कार याने तेल्हारा तालुक्यातील एका महिला शिक्षीकेचा कोणत्या न कोणत्या कारणावर पाठलाग करायचा या सोबतच तिला धमकी सुध्दा देत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या महिला शिक्षीकेने हिवरखेड पोलीस स्टेशनला पातूर येथील अनिल आयस्कार या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या वरुन अनिल आयस्कार या शिक्षकाच्या विरोधात ३५४ (ड), ५०६, ५०० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झाल्या नंतर अनिल आयस्कार हा शिक्षक फरार आहे तर या शिक्षकाच्या शोधात हिवरखेड पोलीस पातूर मध्ये दाखल झाले असुन या शिक्षकाची कसुन शोध घेतल्या जात आहे . शिक्षकी सारख्या पेशाला काळीमा फासणार्या शिक्षकाच्या विरोधात रोष व्यक्त केले जात आहे विशेष म्हणजे अनिल आयस्कार शिक्षक हा गेल्या काही वर्षा पासुन एका माजी आमदाराच्या जवळचा असल्याचे भासवत होता व स्वताला शिक्षक नेता समजत होता परंतू आयस्कार याच्या या अश्लील कृत्या मुळे शिक्षकाची प्रतीमा मलीन झाली आहे.