अकोला –आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 230 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 199 अहवाल निगेटीव्ह तर 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आज तीन जणांचे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचेही जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.30) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 10478(8425+1876+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 70013 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 68365 फेरतपासणीचे 285 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1363 नमुने होते. आजपर्यंत एकूण 69916 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 61491 तर पॉझिटीव्ह अहवाल 10478(8425+1876+177)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 31 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी 31 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व 23 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील गोरक्षण रोड येथील चार, शास्त्री नगर, बाळापूर नाका, निखील किबे वाडा खोडके हॉस्पीटल, सिव्हील लाईन व खदान येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित पुन्दा ता. अकोट, केडीया प्लॉट, कौलखेड, मोठी उमरी, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, कामा प्लॉट, मुर्तिजापूर, पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, पोलिस स्टेशन रामदासपेठ, नजरिया हाऊस मुर्तिजापूर रोड, नानक नगर, जठारपेठ, पक्की खोली सिंधी कॅम्प, बार्शिटाकळी, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
काल (दि. 30) रात्री रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्याचाही समावेश आजच्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
16 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक तर बिहाडे हॉस्पीटल येथून दोन तसेच होम आयसोलेशन मधील सहा, अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तीन मयत
दरम्यान आज तीन जणांचे मृत्यू झाले. त्यात देशमुख फाईल, रामदास पेठ येथील 79 वर्षीय पुरुष असून तो दि. 25 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, खेतान नगर कौलखेड येथील 70 वर्षीय पुरुष असून तो दि. 9 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर खाजगी रुग्णालयातून वंजारीपुरा ता. बार्शिटाकळी येथील 52 वर्षीय पुरुष असून तो दि. 25 डिसेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.
409 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 10478(8425+1876+177) आहे. त्यातील 322 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 9747 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 409 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.