तेल्हारा – तेल्हारा नगर परिषदेच्या प्रभाग क्र 8 मधील सर्वांगीण विकास कामाचा चरित्र लेखाजोखा दिनांक 26 डिसेंबर रोजी एका विशेष समारंभात दिनदर्शिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
दिनदर्शिका विमोचन समारंभ भारतरत्न स्व अटल बिहारी वाजपेयी सभागृह न प तेल्हारा येथे संपन्न झाला या समारंभास नगराध्यक्ष जयश्रीताई पुंडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे , प्रभाग क्र 8 नगरसेवक गटनेते प्रतापराव देशमुख, शिक्षण सभापती आरतीताई गायकवाड, दुर्गाताई भटकर, गट नेते नरेश आप्पा गंभीरे, भाजपा जेष्ठ नेत्या स्मिताताई राजनकर, बांधकाम सभापती सुनील राठोड मंगेश सोळंके, भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका, ज्येष्ठ पत्रकार सुरेश शिंगणारे मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती दिवंगत नेते स्व पंडितराव राजनकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन हारार्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक व सूत्रसंचालन तेल्हारा शहर भाजपा सरचिटणीस तथा एकता बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे सचिव गजानन गायकवाड यांनी केले याप्रसंगी जयश्रीताई पुंडकर, प्रतापराव देशमुख पत्रकार सुरेश शिंगणारे यांची सयोचीत भाषणे झालीत दिनदर्शिका विमोचन समारंभ सर्वश्री शहर सरचिटणीस रवी गाडोदिया, उपाध्यक्ष विजय देशमुख, भा ज यु मो शहर अध्यक्ष गणेश इंगोले, तालुका प्रसिद्धीप्रमुख रवी शर्मा, पंकज देशमुख, भाजयुमो जिल्हा सचिव सुमित गंभिरे, मोहन भटकर, नितिन ढोके, अशोक गव्हाळे, मनोज कनोजी ,दिपक मोडक, सतीश तावरे, सनी सोनोने, शिवा अम्रुतकार, सचिन बागलकर, शरद वानखडे, विशाल घोडे, आनंद वानखडे, कृष्णा सोनोने, बबलु भटकर, क्रिस पाखरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ता एकता मंडळाचे कार्यकर्ते विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते दिनदर्शिकेत प्रभाग क्र 8 मध्ये करण्यात आलेल्या वीर हनुमान व्यायाम शाळा व्यायाम साहित्य पेव्हर मार्ग समाज मंदिर कंपाउंड फिनिशिंग सिलकोट समाज मंदिर दुरुस्ती काँक्रिट रोड व नाल्या काँक्रिट गटार रस्ता खडीकरण कोरोना कालखंडात रोगप्रतिकारक शक्ती वर्धक औषधी व सैनी टायझर चे वितरण कचरा उचलणे कामी घंटागाडी मार्ग नामकरण स्नेहसंमेलन शिवाजी महाराज प्रवेशद्वार स्मारक सौंदर्यीकरण समाजोपयोगी उपक्रम आयोजन आधीचे चरित्र दिनदर्शिकेत करण्यात आले आहे