तेल्हारा(प्रतिनिधी)- दिनांक २३/१२/२०१६ ला नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तापडिया नगर मधील सभागृहाला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे नाव देण्याचा ठराव(ठराव क्र ९) सर्वानुमते पारित करण्यात आला होता. तरी तेव्हा पासून या ठरावाची अंमलबजावणी झालेली नसून ते सभागृह निनावी अवस्थेत पडलेले आहे. २३ फेब्रुवारीला कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती असून त्याच्या आधी तापडिया नगर मधील सभागृहाला गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना पाणी पुरवठा सभापती सौ नलिनी ताई तायडे यांनी केली आहे . तसेच शाळा क्रमांक २ मधील गाडगेबाबा यांच्या पुतळ्याचा कलर गेला असून त्यांच्या स्मारकाची खूप वाईट परिस्थिती आहे तरी त्यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी व डागडुजी व लाईट ची व्यवस्था करण्यात यावी, ज्यांनी संपूर्ण विश्वाला स्वच्छतेचा संदेश दिला त्या गाडगेबाबांच्या शाळा क्र २ मधील स्मारकाची आठवड्यातून किमान एकवेळा तरी स्वच्छता करण्यात यावी त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल असे निवेदनात सौ तायडे यांनी म्हटले आहे .