अकोट(शिवा मगर)– दि 24 अकोट तालुक्यातील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत उमराबीट मधिल ग्राम बोर्डी येथे गोपनीय माहीती मिळाल्या वरुन आज जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या पथकाने बोर्डी येथिल रविंद्र अर्जुन लटकुटे याच्या घरी छापा टाकला असता अवैध देशीचे 165 क्वार्टर अंदाजे किंमत 5000 हजार रुपयेचा माल जप्त करुन आरोपि विरुध्द दारूबंदी कायद्यां अन्वये ग्रामीण पोलिस स्टेशन अकोट येथे गुन्हा दाखल केला असुन आरोपीला अटक केली आहे.