अकोला – पोलिस अधिक्षक अकोला यांच्या विशेष पथकाने आज दि.२३/१२/२०२० रोजी जनता भाजी बाजार अकोला येथील वरली मटका जुगारावर धाड टाकली असता त्या दरम्यान १) राजेश जगदीश पाठक वय ६१ वर्ष रा. हरिहर पेठ अकोला २) संजय बाबन माळी वय ४१ वर्ष रा. जुने शहर अकोला ३) मुस्ताक अहमद खान ताज खान वय ६३ वर्ष रा. बैद पुरा अकोला.४) चंद्रकांत गोविंदराव नगरे वय ४५ वर्ष रा. बाळापूर रोड अकोला ५) संजय चरणदास लहूकार वय ४५ वर्ष रा. हरिहर पेठ अकोला ६) प्रवीण सुरेश दळवी वय ३९ वर्ष रा.बाळापूर नाका अकोला ७) नितीन बबनराव उठाले वय ४१ वर्ष रा. जवाहर नगर अकोला ८) अमित शाम सुरेखा रा. गीता नगर अकोला यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून मिळालेल्या आरोपी पासून एकूण ६,४५०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री.जी श्रीधर साहेब, अकोला तसेच पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास रमेश पाटील यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.