तेल्हारा – तेल्हारा तालुक्यातील चोहिकडे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण झाली यामधून गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची परिस्तिथी जैसे असल्याने तसेच धुळीचे प्रमाण वाढल्याने अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की तालुक्यातील रस्ते जीवघेणे झाले असून अनेक वर्षांपासून रस्ते खोदून ठेवल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवा लागत आहे मात्र कितीही सावधानता बाळगली तरी अपघाताला सामोरे जावे लागत आहे अशातच बेलखेड येथील गोपाल मनोहर सदाफळे हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ३० ए एम ७६५४ याने तेल्हारा येथे काही कामा निमित्य दि २१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता येत असताना हॉटेल श्रद्धा समोर प्रचंड धुळीमुळे तसेच ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराने रस्त्यावर खोदलेल्या १० फूट खड्यात दुचाकी घेऊन पडल्याने जखमी झाले यावेळी तिथे उपस्तीत नागरिकांनी लगेच धाव घेऊन दुचाकी चालकाला बाहेर काढून उपचारासाठी दवाखान्यात नेऊन उपचार केला.सार्वजनीक बांधकाम विभागाने याबाबत पाऊले उचलून नागरिकांना होणारा त्रास अन ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला लगाम लावावा अशी मागणी होत आहे.