अकोला : अकोला शहरात मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट चालविण्याची तरुणां मध्ये क्रेज आली आहे, बुलेट च्या सायलेन्सर मध्ये काही बदल केला की गाडी रेस केली की फटाका फुटल्या सारखा आवाज येतो, बऱ्याच वेळेस रात्री अश्या बुलेट मुळे आजारी माणसे व जेष्ठ नागरिकांना त्रास होतो, ह्या बाबत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना काही जेष्ठ नागरिकांनी फोन द्वारे तोंडी तक्रार केली असता त्यांनी ह्याची गंभीर दखल घेऊन त्या विरुद्ध त्यांचे सहकारी कर्मचाऱ्या सह मोहीम सुरू करून पहिल्याच दिवशी 5 बुलेट ट्राफिक ऑफिस मध्ये लावल्या, सदर बुलेट वर पुढील कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील भौगोलिक परिस्थिती मुळे व रस्त्याचे कामकाज सुरू असल्याने अपुऱ्या मनुष्यबळा मुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यातच वाहतूक पोलिसांची धावपळ होते, तरुणांनी जबाबदार नागरिकांचे कर्त्याव्य म्हूणून तरी सर्व सामान्य नागरिकाला त्रास होणार नाही ह्याची जाणीव ठेवून वाहन वापरावे, फटाके फोडणाऱ्या बुलेट विरुद्ध कडक कारवाई करणार आहोत असे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.