• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 3, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील रँकिंग मध्ये 38 व्या स्थानावर झेप

Team by Team
December 9, 2020
in अकोला, Featured, शिक्षण
Reading Time: 1 min read
88 1
0
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची राष्ट्रीय स्तरावरील रँकिंग मध्ये 38 व्या स्थानावर झेप
14
SHARES
633
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : देशांतर्गत एकूण 74 कृषी विद्यापीठे कार्यरत असून विद्यापीठांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कार्याचा वार्षिक आढावा भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारा दरवर्षीच घेण्यात येतो. नुकताच सन 2019 चा आयसीएआर मानांकन (रँकिंग) अहवाल जाहीर करण्यात आला असून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तब्बल 10 अंकांनी झेप घेत गतवर्षीच्या 48व्या क्रमांकावरून 38 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारे जानेवारी 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीसाठी देशांतर्गत कृषि विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, विविध पुरस्कार, संशोधनात्मक लेख, वार्षिक बजेट, पदभरती, प्रायोजित प्रकल्प, आदीं सह विविध विषयांवर केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. गतवर्षी मानांकनातील उणिवा, त्रुट्या, सादरीकरणाची पद्धती यावर सारासार विचार करीत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठ स्तरावर मानांकन समिती स्थापन केली होती. विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेले या समितीमध्ये प्रा डॉ. नितीन कोष्टी, प्रा नितीन गुप्ता, प्रा.डॉ.अजय सदावर्ते, प्रा.डॉ.श्रीकांत ब्राह्मणकर, प्रा.डॉ. निरज सातपुते,प्रा. डॉ. मंगेश मोहरील यांचा समावेश होता. विद्यापीठाचे आयसीएआर नोडल ऑफिसर डॉ. शशांक भराड सदस्य सचिव असलेल्या या समितीने संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्रे,कृषी विज्ञान केंद्रे, यासह विषयवार विभागांच्या तयारीचा ढाचा तयार केला होता.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रा डॉ विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा.डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता उद्यांविद्या प्रा.डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर वडतकर यांचेसह सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात हे उद्दिष्ट साध्य केले. या संपूर्ण प्रक्रियेत नोडल ऑफिसर प्रा.डॉ.शशांक भराड यांनी सर्वच स्तरावर निरंतर पाठपुरावा केला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विलास भाले यांनी या यशा करिता सर्वांचे अभिनंदन केले असून, मानांकन सुधारणांसाठी असलेला वाव लक्षात घेत प्रयत्नांची अधिक पराकाष्टा करीत राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाला प्रतिष्ठेचे स्थान मिळण्यासाठी अधिक कार्य करावे असे आवाहनही केले आहे

Tags: आयसीएआर मानांकनडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
Previous Post

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत

Next Post

जिल्हा परिषदांच्या आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
जिल्हा परिषदांच्या आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी

जिल्हा परिषदांच्या आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी

महाबीज अधिकारी व कर्मचारी संपावर

महाबीज अधिकारी व कर्मचारी संपावर

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.