वाडेगाव(डॉ चांद शेख) – केंद्र सरकारच्या जाचक कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शेतकरी, व्यापरी, काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, वंचीत बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, प्रहार, शेतकरी पक्ष, व इतर राजकीय पक्ष ,संस्था च्या वतीने आज भारत बंद च्या आव्हानाला आज दि. ८/१२ ला वाडेगाव येथील शेतकरी, व्यापरी, काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, वंचीत बहुजन आघाडी, भारत मुक्ती मोर्चा, प्रहार, शेतकरी संघटनांनी १०० टक्के बंद टेऊन आपले समर्थन शेतकरी आंदोलनाला दिले आहे. या वेळी गावातील वरील पक्षाचे पदाधीकारी, सर्व सदस्य, माजी पं स.उपसभापती ,सदस्य आजी पंस. सदस्य, माजी ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच शेतकरी, मजुर , गावकरी इत्यादी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते गावकरी जनता वाडेगाव यांन दिनांक ८/१२/२०२० रोजी मंगळवार ला संपूर्ण वाडेगाव बंद शेतकऱ्यांच्या समर्थनात आपली दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवली . या वेळी वाडेगांव चौकी चे पी एस आय वसाडे यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्या सोबत चोक बंदोबस्त ठेवला