तेल्हारा (योगेश नायकवाडे) :- तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील युवा कार्यकर्ते रोशन बोंबटकार यांची महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य च्या अकोला जिल्हा संघटक निवड झाली आहे.
नियुक्ती पत्रात अकोला जिल्हा अध्यक्ष यांनी म्हटले आहे की, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आणि आचार यांच्यावर संघटनेची मूलतत्त्वे आधारलेली आहेत. ज्योतिबांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे साहित्य, जनसामान्यांना वाचायला मिळावे, त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी संघटना काम करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा यासाठी महात्मा फुले ब्रिगेड सातत्याने पाठपुरावा करत आहे. हे कार्य आणखी वाढविण्यासाठी रोशन बोंबटकार यांनी प्रयत्न करावेत तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच आपण स्वीकारलेले समाजसेवेचे व्रत वटवृषाप्रमाणे वाढत जावे असेही अकोला जिल्हा अध्यक्ष यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे. रोशन बोंबटकार यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.












