तेल्हारा(प्रा. विकास दामोदर)– प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2022 पर्यंत प्रत्येकाला घर ही यो जना राबविली जात आहे गरजू लोकांना यात प्राधान्य दिले जाते परंतु अनेक वर्षा पासून तळेगाव पातुर्डा येथील नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही, या योजनेच्या माध्यमातून बेघर, कच्चे मातीच्या घरे, विधवा, अपंग अशा निकष ठेऊन लाभार्थी ठरविल्या जातात पण, येथील नागरिकांना त्यांची घरे खराब झालेली आहेत मातीची, टिनाची, ताडपत्री ची, कुळाची घरे असून सुद्धा घरकुल यादीत अनेकांचे नाव नाहीत.अनेक दिवसापासून अर्ज करून सुद्धा त्यांना पोच पावती मिळाली नाही. घरकुल तर दूर, हि घरे कधीही झोपेत त्यांच्या अंगावर पडतील यांचा नेम नाही.
आपल्या हक्काचे घरकुल मिळण्यासाठी येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी प स तेल्हारा, यांना निवेदन दिले, या योजने पासून वंचित नागरिकांना कधी न्याय मिळेल, याकळे सर्वांचे लक्षच लागले आहेत, या निवेदनावर पुरुषोत्तम पाचपोर,कस्तुरा बाई फोकमारे,भगवान दहीकार, वामन पाचपोर,भरत पाचपोर, रमेश पाचपोर, यशोदा बावणे, अशोक सपकाळ, गोपाळा पाचपोर, पद्माबाई पाचपोर, सीताराम इंगळे, सत्यभामा पटोकर, अशी ऐकूण 62 नागरिकांच्या सह्या आहेत