अकोला – दुचाकीवर येऊन गुन्हे करणाऱ्या तसेच चोरीच्या दुचाकींचा गुन्ह्यात वापर करणाऱ्या गुन्हेगारांना चाप लागावा म्हणून पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे निर्देशा प्रमाणे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनिका राऊत, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी मागील एक महिन्या पासून धडक कारवाई करून आज पावेतो दुचाकी चालविताना वैध कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या किंवा अधिकृत मान्यताप्राप्त अँप मध्ये वैध कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत न दाखविल्यास अश्या दुचाकी वाहतूक शाखेच्या कार्यालयात डेटेंड करण्यात येऊन वैध कागदपत्र दाखविल्या नंतर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात येत आहेत, आज पावेतो अश्या 502 दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्या असून ज्या दुचाकींचे वैध कागदपत्रे सादर केले नाहीत अशा दुचाकी अजूनही वाहतूक कार्यालयात अटकावून ठेवण्यात आल्या आहेत, अश्या प्रकारची कारवाई टाळण्यासाठी सर्व दुचाकी चालकांनी आपल्या वाहनांचे वैध कागदपत्रे जवळ बाळगावे किंवा मान्यताप्राप्त अँप्स जसे की डिजी लॉकर सारख्या अँप्स मध्ये कागदपत्रांची स्कॅन कॉपी करून ठेवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले आहे।