• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 12, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित किरण सरनाईक विजयी

Team by Team
December 5, 2020
in Featured, Amravati
Reading Time: 1 min read
81 1
0
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित किरण सरनाईक विजयी
15
SHARES
588
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत किरण रामराव सरनाईक हे अपक्ष उमेदवार 15 हजार 606 मते मिळवून विजयी ठरले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी श्री. सरनाईक यांना विजयी उमेदवार म्हणून प्रमाणपत्र वितरीत केले.

सहायक निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी विविध अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विजयी उमेदवार म्हणून घोषित होण्यासाठी 14 हजार 916 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पंचविसाव्या फेरीअखेर श्री. सरनाईक यांना 15 हजार 606 मते मिळून हा कोटा पूर्ण झाला. दुस-या क्रमांकाची मते प्रा. श्रीकांत देशपांडे यांना मिळाली

हेही वाचा

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

तब्बल 36 तासांहून अधिक काळ चालली मतमोजणीची प्रक्रिया

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली व सुमारे 36 तासांहून अधिक काळ मतमोजणीची प्रक्रिया चालली. विलासनगर येथील शासकीय गोदाम येथे असलेल्या मजमोजणी स्थळी गुरुवारी सकाळी सहा वाजताच सर्व अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सर्वांना पुन्हा त्यांची जबाबदारी समजावून देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा कक्षाचे सील तोडून मतपेट्या मतमोजणी कक्षात हलविण्यात आल्या. निवडणूक निरीक्षक आनंद लिमये, निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व विविध अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणे, सरमिसळ आदी कामे पूर्ण करण्यात आली. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी 86.73 आहे. मतमोजणी दोन कक्षात 14 टेबलवर घेण्यात आली. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर ठेवण्यात आले. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण झाले.

प्रथम पसंतीच्या पहिल्या फेरीचा निकाल
पहिल्या राऊंडमध्ये वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध व 13 हजार 511 मते वैध ठरली.या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- 666, श्रीकांत देशपांडे – 2300, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.

प्रथम पसंतीच्या दुसऱ्या फेरीचा निकाल
पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली.या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) : डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७), श्रीकांत देशपांडे – २८२२ (५१२२), अनिल काळे – १४ (२६) , दिलीप निंभोरकर- ४०४ (५५५), अभिजित देशमुख – १४ (२३), अरविंद तट्टे- ६६ (७९), अविनाश बोर्डे- १५७३ (२७४७)), आलम तनवीर- १७(२६), संजय आसोले- ७४ (१०४) , उपेंद्र पाटील- १४ (३५), प्रकाश कालबांडे- ७८२ (१२१९) , सतीश काळे- ११ (८९), निलेश गावंडे- ९३९ (२१२२), महेश डावरे- १४९ (२९०) , दिपंकर तेलगोटे- १०(१६) , डॉ. प्रवीण विधळे- ९ (१६) , राजकुमार बोनकिले- २२४ (५७२), शेखर भोयर- २८११ (४८८९) , डॉ. मुश्ताक अहमद- १७ (२५) , विनोद मेश्राम – ८ (१५) , मो. शकील- १८ (३२), शरद हिंगे- २९ (५४), श्रीकृष्ण ठाकरे- १० (२०) , किरण सरनाईक – २९५७ (६०८८), विकास सावरकर – ३११ (६२५) , सुनील पवार- २१ (५६), संगीता शिंदे- १५५३ (२८५७).त्यानुसार दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला. या कोट्याची आकडेवारी 14916 अशी निश्चित झाली.

एकूण वैध मतांप्रमाणे ठरविण्यात आलेला मतांचा कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. या गणनेत सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरून दुस-या क्रमांकाची मते तपासण्यात आली. गणनेअंती कमी मते पडलेल्या उमेदवारांना बाद करण्याची प्रक्रिया सुरु झाली. दुस-या पसंतीच्या मतांची गुरुवारी सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्रीपर्यंत अविश्रांतपणे सुरू होती. त्यात फेरीनिहाय कमी मते मिळालेले उमेदवार बाद होत गेले. अखेरच्या फेरीपर्यंत बाद न झालेल्या उमेदवारांत किरण सरनाईक व श्रीकांत देशपांडे हे उमेदवार उरले. किरण सरनाईक यांना सर्वाधिक मते होती. तथापि, कोटा पूर्ण झालेला नसल्याने दुस-या क्रमांकावरील उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या मतांपैकी दुस-या क्रमांकाची जी मते सरनाईक यांना होती, ती त्यांच्या कोट्यात टाकण्यात आली. त्यानुसार 3 हजार 173 मते जमा होऊन किरण सरनाईक यांना 15 हजार 606 मते मिळाली व त्यांचा कोटा पूर्ण झाला. या प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर विजयी उमेदवाराची घोषणा व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

Tags: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघकिरण सरनाईक
Previous Post

समृध्दी महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांचा अमरावती औरंगाबाद दौरा

Next Post

आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न

RelatedPosts

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला
Featured

पाहुणे येत आहेत पोरी’..’स्थळ’ चित्रपटातलं गाणं भेटीला

February 12, 2025
सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना
Featured

ऐकाव ते नवलच सिबील स्कोअर खराब म्हणून लग्न मोडल,अकोला जिल्ह्यातील घटना

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
Next Post
आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न

आ.रणधीरभाऊ सावरकर यांचे हस्ते घरकुलांचे भूभिपूजन संपन्न

सावरा येथे योग मुद्रा शिबीर व  सत्कार समारंभ संपन्न

सावरा येथे योग मुद्रा शिबीर व सत्कार समारंभ संपन्न

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.