अकोला(प्रतिनिधी) – विश्व वारकरी सेना,वारकरी साहित्य परिषद,वारकरी संघटनांच्या विद्यमाने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वारकऱ्यांचे भजन–कीर्तनासह 2 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरु झाले आहे. युवा विश्व वारकरी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शेटे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत.इतर वारकरी मंडळी ही साखळी पद्धतीने आमरण उपोषण करीत आहेत.आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसाला शासनाच्या व प्रशासनाच्या ऐकही अधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाला भेट न दिल्यामुळे वारकरी संप्रदायातील संत मंडळींमध्ये सरकार विषयी तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. सरकारने जर शंभर भाविकांना धार्मिक कार्यक्रमाला त्वरित परवानगी दिली नाही तर ह भ प अरुण महाराज बुरघाटे विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष महाक्षेत्र पंढरपूर येथे पांडुरंगाच्या महाद्वारात आत्मदहनाचा इशारा देण्यात येईल असे आवाहन करण्यात आलेले आहे.आमरण उपोषणामध्ये किंवा आत्मदहन यामध्ये महाराजांची जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदार सरकारची राहील म्हणून सरकारने वारकर्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित मागणी पूर्ण करून वारकरी संप्रदायाला एक प्रकारे सहकार्य करावे.
आज उपोषण मधे किर्तन सेवा ज्ञानेश्वर महाराज सोळंके,श्रीधर महाराज पातोंड, रामकृष्ण महाराज आंबुस्कर,राम महाराज गवारे याची सेवा पार पडली. चंद्रशेखर पांडे गुरुजी, राजेंद्र पातोडे सिद्धार्थ शिरसाट,धीरज शिरसाट,गोपाल कोल्हे यांनी भेट दिली.आमरण उपोषणाला उपस्थित महाराज मंडळी विठ्ठल महाराज साबळे,महादेव महाराज निमकंडे, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, गोदावरीताई बंड,शिवहरी महाराज ईस्तापे,गजानन महाराज दहिकर,रामकृष्ण महाराज आंबुस्कर, दिनेश महाराज भामोद्रे,श्याम महाराज साबळे,शिवा महाराज बावस्कर,प्रविण महाराज कुलट,राम महाराज गवारे,श्रीधर महाराज तळोकार,सोपान महाराज ऊकर्डे, विक्रम महाराज शेटे,गजानन मोडक,केशव महाराज धोटे,गोपाल महाराज रेवस्कर,राजूभाऊ खुडे,श्याम महाराज धनोकार,विजय महाराज राऊत,गोपाल महाराज रेवस्कार,श्रीधर महाराज तळोकार, विलास महाराज कराड,अमोल महाराज कुलट,वैभव महाराज अस्वार,ज्ञानेश्वर महाराज भुस्कट, कृष्ण महाराज वाघुळ,दिनेश महाराज भामोद्रे,योगेश महाराज तांबडे,तुषार महाराज पाटील,संभाजी महाराज तनपुरे,शिवाजी महाराज अमृतकर, श्रीधर महाराज पातोंड,गणेश महाराज जायभाये,ज्ञानेश्वर महाराज सोळंके,नारायण महाराज काळे,ज्ञानेश्वर महाराज जावरकर,गीरी महाराज यांची उपोषणाला उपस्थिती लाभली.